प्रत्येक बाधित गावाला निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:39 AM2018-09-14T00:39:47+5:302018-09-14T00:40:06+5:30

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत प्राप्त ३१३ कोटींचे वितरण करताना ज्यांचा पहिला अधिकार आहे, असे जिल्ह्यातील ६०१ गावांना नियमानुसार एकूण निधीच्या ६६ टक्के निधी वितरित करावा. त्यात एकही गाव व बाधित शहरे सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.

Fund each affected city | प्रत्येक बाधित गावाला निधी द्या

प्रत्येक बाधित गावाला निधी द्या

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : आढावा बैठकीत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत प्राप्त ३१३ कोटींचे वितरण करताना ज्यांचा पहिला अधिकार आहे, असे जिल्ह्यातील ६०१ गावांना नियमानुसार एकूण निधीच्या ६६ टक्के निधी वितरित करावा. त्यात एकही गाव व बाधित शहरे सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्याला प्राप्त निधीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील नगर आयुक्त, मुख्याधिकारी व ग्रामपंचायत सरपंचांनी याबाबत अत्यंत जागरूक राहून आपल्या हक्काचा निधी मिळविण्यासाठी गावाच्या गरजेनुसार आपले प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे अंदाजपत्राकांसह सादर करावे, अशी सूचना ना. अहीर यांनी केली. बाधित क्षेत्रामध्ये शुध्द पिण्याचे पाणी ही मोठी गरज असून आर. ओ. वॉटर एटीएम बाधित गावात लावण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली.
बाजार ओट्यांचे सौंदर्यीकरण, शाळा, ग्रा.पं., ग्रामीण पाणीपुरवठा यासारख्या स्थानिक उपक्रमात सोलर विद्युत व्यवस्था करण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सुचविले. पांदण रस्त्याचा मोठा प्रश्न असून खनिज विकास अंतर्गत पांदण रस्ते घेण्याची मोठी संधी बाधित गावांना उपलब्ध आहे, याची याकडेही ना. अहीर यांनी लक्ष वेधले.
हा निधी गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्यास प्रत्येक बाधित व अप्रत्यक्ष बाधित गावांना व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निधी वाटप केल्यास तो न्यायोचित ठरेल, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या माध्यमातून विकासाची मोठी संधी दिली असून त्याचा सर्वात जास्त लाभ चंद्रपूर जिल्ह्याला होणार आहे. त्यामुळे अधिकाºयांनी नियमानुसार आराखडयात कामे समाविष्ट करावीत, असे निर्देश दिले.
या बैठकीला आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, महापौर अंजली घोटेकर, चंद्रपूर मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपमहापौर अनिल फुलझेले, अधीक्षक अभियंता, आदी उपस्थित होते.

Web Title: Fund each affected city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.