निधी मिळाला १.६४ कोटी, खर्च मात्र २८ लाख

By admin | Published: October 3, 2015 12:50 AM2015-10-03T00:50:43+5:302015-10-03T00:50:43+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या विकासाला चंदनखेड्यामध्ये अखर्चित निधीचे ग्रहण लागले आहे.

The fund received 1.64 crore, the expenditure was only 28 lakhs | निधी मिळाला १.६४ कोटी, खर्च मात्र २८ लाख

निधी मिळाला १.६४ कोटी, खर्च मात्र २८ लाख

Next

खासदारांच्या दत्तक गावाला अखर्चित निधीचा अडथळा
चंदनखेड्यात करायची होती ६९ कामे : अनेक कामांसाठी निधीची तरतूदच नाही

गोपालकृष्ण मांडवकर  चंद्रपूर
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या विकासाला चंदनखेड्यामध्ये अखर्चित निधीचे ग्रहण लागले आहे.
गेल्या वर्षभरात या दत्तक गावाच्या विकासासाठी ६९ कामांकरिता १३ कोटी ४८ लाख ६४ हजार रूपयांची मंजुरी मिळाली असली तरी निधी मात्र १६४ कोटी रूपयांचाच मिळाला आहे. त्यातही फक्त २८ लाख ४५ हजार रूपयांचीच कामे या गावात आजवर झाली आहेत. निधी येऊनही तो खर्च न होण्यामागे असलेल्या उदासिन मानसिकतेमुळे या गावाचा विकास मात्र मंदावला आहे.
सांसद आदर्श ग्राम योजनअंतर्गत प्रत्यक खासदारांना एक गाव दत्तक घ्यायचे होते. त्यानुसार केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा हे गाव दत्तक घेतले. या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी एकूण १९ विभाग आणि यंत्रणांकडून ६९ कामांची आखणी करण्यात आली होती. त्यातील आठ कामांसाठी तरतूद होऊनही निधी मिळालाच नाही. ६१ कामांसाठी १६४ कोटी रूपयांचा निधी मिळाला असला तरी, प्रत्यक्ष सात कामांवर छदामही खर्च झाला नाही. फक्त चार विभागांनीच काही कामांवर खर्च केला आहे. यामुळे लक्षवधीचा निधी मिळूनही तो शासनाच्या तिजोरीत तसाच पडून आहे.
विशेष म्हणजे, मिळालेला निधी येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचा आहे. हा कालावधी संपायला फक्त दोन महिने उरले असतानाही मोठ्या प्रमाणावर कामे बाकी आहेत. चंदनखेडा हे गाव विकसनशिल आहे. या गावात विकासकामांची आवश्यक असतानाही यंत्रणा मात्र उदासिन आहे. वनविभाग, पशु संवर्धन विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग या विभागांना कामासाठी येथे बराच वाव असतानाही छदामही खर्च केलेला नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मिळालेल्या ३ लाख ७५ हजार रूपयांपैकी ३ लाख २५ हजार रूपयांचा निधी कामांवर खर्च केला आहे.
केवळ या विभागातील जिल्हा परिषदेची आघाडी वगळली तर अन्य ठिकाणी जिल्हा परिषद माघारली आहे. या उदासिनतेमुळे सांसद आदर्श ग्राम योजनेला जिल्ह्यात खिळ बसण्याची शक्यता बळावली आहे.

या विभागाच्या कामांना निधीच नाही
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पाटबंधारे विभाग, वन विभाग, बांधकाम विभाग (जि.प.), महिला व बालकल्याण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, समाज कल्याण विभाग, लघु सिंचन विभाग (जि.प.),
निधी मिळूनही खर्च शून्य
जिल्हा क्रीडा विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, विद्युत विभाग, पशु संवर्धन विभाग (जि.प.), प्राथमिक शिक्षण विभाग (जि.प.), कृषी विभाग (जि.प.), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
झालेली कामे
लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग, आरोग्य विभाग (जि.प.), मग्रारोहयो (ग्रामपंचायत स्तर), पाणी व स्वच्छता मिशन कक्ष

अखर्चित निधीत जिल्हा परिषदच आघाडीवर
निधी मिळूनही तो खर्च न करण्यात जिल्हा परिषदच आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, खासदारही भाजपाचे आहेत आणि जिल्हा परिषदेत सत्ताही भाजपाची आहे. असे असतानाही निधी खर्च करण्यात पदाधिकाऱ्यांना रूची का नसावी, हा चिंतनाची विषय आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग आणि लघु सिंचन विभागाने तर १७ कामे प्रस्तावित करूनही निधीच दिला नाही.  

काम ढेपाळले हे खरे आहे. यासाठी यंत्रणा कामी लावली आहे. डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला निर्देश दिले आहे. या संदर्भात ३ आॅक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक ठेवली आहे.
- हंसराज अहीर,
केंद्रीय रसायन राज्य मंत्री

Web Title: The fund received 1.64 crore, the expenditure was only 28 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.