पाच कोटी ७९ लाखांचा निधी ‘त्या’ गावांसाठी वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:48+5:302021-08-17T04:33:48+5:30

कृषिपंप वीजजोडणी व थकबाकी सवलत अंतर्गत चंद्रपूर परिमंडलातील चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, गडचिरोली व आलापल्ली विभागातील ३१ हजार ...

A fund of Rs 5 crore 79 lakh will be used for 'those' villages | पाच कोटी ७९ लाखांचा निधी ‘त्या’ गावांसाठी वापरणार

पाच कोटी ७९ लाखांचा निधी ‘त्या’ गावांसाठी वापरणार

Next

कृषिपंप वीजजोडणी व थकबाकी सवलत अंतर्गत चंद्रपूर परिमंडलातील चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, गडचिरोली व आलापल्ली विभागातील ३१ हजार ८०७ कृषिपंप ग्राहकांनी २६ कोटी ९५ लाखांचा भरणा केला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील २२ हजार १२१ कृषी ग्राहकांनी १७ कोटी ५७ लाख, तर गडचिरोली जिल्ह्यातील ९ हजार ६६८ ग्राहकांनी ८ कोटी ७३ लाख ४२ रुपयांचा भरणा करून थकबाकी मुक्तीची वाट धरली. ६६ टक्के म्हणजे ११ कोटी ५१ लाखांची रक्कम गाव व जिल्हा मिळून मूलभूत सुविधांसाठी उपलब्ध झाली आहे.

बॉक्स

विकासाला मिळणार चालना

कृषिग्राहकांद्वारे भरणाऱ्या थकबाकीतील ३३ टक्के रक्कम संबंधित ग्राहकांच्या गावातील पायाभूत कामांसाठीच खर्च केली जाणार आहे. या योजनेचा लाभ कृषिपंपधारकांना व्हावा, यासाठी महावितरणचे अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. कृषिपंप वीज देयक थकबाकीदारांनी भरणा करावा, असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे.

Web Title: A fund of Rs 5 crore 79 lakh will be used for 'those' villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.