आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान मौलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:09 AM2018-11-19T00:09:37+5:302018-11-19T00:10:00+5:30

संस्कृतीचे प्रामाणिकपणे जतन व संवर्धन करणाऱ्या आदिवासींनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेला लढा बावनकशी होता. मात्र हा इतिहास लिहिला गेला नाही. यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प शासनाने उचलला आहे.

Fundamental contributions to Tribal's Indian independence struggle | आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान मौलिक

आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान मौलिक

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा कारागृह परिसरातील शहीद बाबुराव शेडमाके स्मारकाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संस्कृतीचे प्रामाणिकपणे जतन व संवर्धन करणाऱ्या आदिवासींनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेला लढा बावनकशी होता. मात्र हा इतिहास लिहिला गेला नाही. यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प शासनाने उचलला आहे. बिरसा मुंडा यांची जयंती देशभर साजरी होत असताना शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाची सुरुवात करत असल्याचा मोठा आनंद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
शहीद बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. नाना श्यामकुळे, आमदार राजू तोडसाम, महापौर अंजली घोटेकर, भगवान बिरसा मुंडा यांचे वंशज सुखराम मुंडा, शहीद बाबुराव शेडमाके यांचे वंशज गोविंदराव शेडमाके, रामचंद्र शेडमाके, गुणाबाई शेडमाके, खुशाल बोंडे, विजय राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, अभियंता मनोज जयस्वाल, दयालाल कन्नाके, विजय राऊत आदी उपस्थित होते.
चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरात १८५७ च्या उठावामध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाºया वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीनिमित्त स्मारक बांधण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली होती. त्याची पूर्तता करण्यासाठी बिरसा मुंडा यांच्या स्मृती अभिवादनाच्या शासनाच्या मोहिमेमध्ये बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज सहभागी झाल्याचा आनंदही ना. अहीर यांनी व्यक्त केला. वीर बाबुराव शेडमाके यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती. त्याठिकाणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिवादन केले. २५ लाख रूपये खर्च करून स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तथापि ही सुरुवात असून जेल प्रशासनाच्या अधिपत्यात असणारी या ठिकाणची गोंड राज्याच्या राजवाड्याची वास्तू मोकळी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन यावेळी ना. अहीर यांनी केले. या देशाचा खरा इतिहास हा आदिवासींचा इतिहास आहे. मात्र त्यांचा संघर्ष लिहण्यात आला नाही. बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज तुमच्यापुढे आहेत. या कुटुंबाच्या बलिदानामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे शहिदांचा सर्वात आधी सन्मान करणे या शासनाचे आद्य कर्तव्य आहे. स्मारकासाठी खासदार निधीतून रक्कम खर्च करण्यात आला. पण ही सुरुवात आहे. आदिवासी बांधवांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. त्यादृष्टीने आमची पाऊले पडत असून आदिवासींना सोडून आमची वाटचाल शक्य नाही. याची आम्हाला जाणीव असल्याचे त्यांनी ना. अहीर यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार तोडसाम म्हणाले, आदिवासी बांधवानी आपली संस्कृती विसरु नये, भाषा, सण उत्सव या माध्यमातून संस्कृती टिकवून ठेवणे आवश्यक आहे. आमदार शामकुळे यांनी या स्मारकासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही दिली. महापौर घोटेकर यांनी वीर बाबूराव शेडमाके यांच्या क्रांतीकारी आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक खुशाल बोंडे यांनी केले.

Web Title: Fundamental contributions to Tribal's Indian independence struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.