रामाळा तलावासाठी खनिज विकासमधून निधी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:27 AM2021-03-06T04:27:33+5:302021-03-06T04:27:33+5:30
रामाळा तलाव चंद्रपूर शहराच्या मध्यभागी आहे. तलावालगत वसाहती असल्यामुळे सांडपाण्यामुळे प्रदूषित झाला. या तलावातील पाण्यामुळे शहरातील भूमिगत पाण्याची पातळी ...
रामाळा तलाव चंद्रपूर शहराच्या मध्यभागी आहे. तलावालगत वसाहती असल्यामुळे सांडपाण्यामुळे प्रदूषित झाला. या तलावातील पाण्यामुळे शहरातील भूमिगत पाण्याची पातळी वाढते. शहरालगत इरई व झरपट नद्या वाहतात. दोन्ही नद्यांमुळे शहरातील पाच लाख लोकसंख्येला उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत नाही. त्यामुळे इको-प्रोने आंदोलन सुरू केले. पर्यावरण राज्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे या आंदोलनाची दखल घेतली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्याशी चर्चा केली. रामाळा तलाव प्रदूषणमुक्त व सौंदर्यीकरण करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे रामाळा तलाव व दोन्ही नद्यांसाठी जिल्हा खनिजला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.