राजुरा शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:26 AM2021-03-28T04:26:37+5:302021-03-28T04:26:37+5:30
सुभाष धोटे : पाच कोटी ११ लाखांच्या विकासकामांना प्रारंभ राजुरा : राजुरा शहर नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात विकासाचे ...
सुभाष धोटे : पाच कोटी ११ लाखांच्या विकासकामांना प्रारंभ
राजुरा : राजुरा शहर नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात विकासाचे नवे क्षितिज गाठत असून याआधी आपण मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यावर्षी पाच कोटी ११ लाखांच्या निधीतून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. राजुरा शहर विकासासाठी आपले पुर्ण सहकार्य असून निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले.
राजुरा नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यात नागरी दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत अं.क्र.१ ते ६ कामे अंदाजित खर्च ८५ लाख ८ हजार रुपये निधी, १४ वा वित्त आयोग अंतर्गत माजी मालगुजारी तलाव विकास व इतर कामे करणे एक कोटी १७ लाख ७३ हजार रुपये निधी, विशेष वैशिष्ट्यपुर्ण योजना अंतर्गत न.प. हद्दीत अ.क्र. १ ते १८ कामे करणे ३ कोटी २७ लाख ६६ हजार रुपये निधी, चुनाळा टी पाईटजवळ सौंदर्यींकरण करणे १८ लाख ७१ हजार रुपये निधी, अशी एकूण पाच कोटी ११ लाखांची विकास कामे शहरात होणार आहेत.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष अरुण धोटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, आरोग्य सभापती आनंद दासरी, सभापती राधेश्याम अडानिया, विरोधी पक्षनेते रमेश नळे, नगरसेवक गजानन भटारकर, नगरसेविका गीता रोहने, संध्या चांदेकर, साधना भाके, अभियंता रवी जामुनकर, कंत्राटदार उपेंद्र गुप्ता यासह सर्व नगरसेवक, न प कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. संचालन विजय जांभुळकर यांनी केले. तर आभार मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी मानले.