चंद्रपूर, बल्लारपूर अन् मुल तालुक्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2023 08:43 AM2023-05-09T08:43:36+5:302023-05-09T08:43:46+5:30

अल्पसंख्याक भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.

Funds sanctioned for the development of minority dominated rural areas in Chandrapur, Ballarpur and Mul talukas | चंद्रपूर, बल्लारपूर अन् मुल तालुक्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी निधी मंजूर

चंद्रपूर, बल्लारपूर अन् मुल तालुक्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी निधी मंजूर

googlenewsNext

चंद्रपूर : चंद्रपूर,बल्लारपूर व मुल तालुक्यातील अल्पसंख्याक भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे अल्पसंख्याक भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.

चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे वॉर्ड क्रमांक एकमध्ये सेंट मायकल चर्चची आवारभिंत बांधण्यासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ऊर्जानगर येथे डब्ल्यूसीएल दुर्गापूर नुरी मदिना मस्जिद व कब्रस्तान येथे पेव्हर्स ब्लॉक व आवारभिंतीचे बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी मुनगंटीवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत शासनाकडून मंजूर करून घेतला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे ईदगाहचे वॉल कम्पाऊंड बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विसापूरच्या कबस्तानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पेव्हर ब्लॉकचे व सीसी रोडचे काम करण्यात येणार आहे. यासाठी १० लक्ष रुपयांचा निधी मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मंजूर झाला आहे.मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे मुस्लिम समाजासाठी खुला रंगमंच बांधण्यात येणार आहे. यासाठी १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवेगाव येथील कब्रस्तानलाही १० लक्ष रुपयांचा निधी खर्च करीत संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.

Web Title: Funds sanctioned for the development of minority dominated rural areas in Chandrapur, Ballarpur and Mul talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.