तलाव खोलीकरणासाठी निधीची तरतूद करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:29 AM2021-01-03T04:29:34+5:302021-01-03T04:29:34+5:30
रोहयो कामांची संख्या वाढवावी भद्रावती : तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. मात्र, कामांची संख्या कमी असल्याने अनेक ...
रोहयो कामांची
संख्या वाढवावी
भद्रावती : तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. मात्र, कामांची संख्या कमी असल्याने अनेक जाॅबकार्डधारकांना कामे मिळत नाहीत. सध्या शेतीपासून पुरेसा रोजगार नाही. त्यामुळे रोहयो कामांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे.
वीज उपकेंद्राची
उभारणी करावी
पोंभुर्णा : तालुक्यात विद्युत ग्राहकांची वाढती संख्या वाढली. देवाडा परिसराला लागून अनेक गावे आहेत. या गावांना वीज पुरवठा करताना अनेक अडचणी येतात. विजेचा दाब पुरेसा राहत नाही. त्यामुळे वारंवार पुरवठा खंडित होतो. देवाडा येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कृषिपंपांना वीज
पुरवठा करावा
नागभीड : तालुक्यात अनेक शेतकरी रबी पिकांसोबत भाजीपाल्याची पिके घेत आहेत. काळानुसार नगदी पिकांंकडे कल वाढू लागला. बऱ्याच शेतकऱ्यांनी जि. प. च्या योजनेतून सिंचन विहिरी खोदल्या. वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपही घेतले. पण वीज पुरवठा न झाल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.