कोरपनाकर बेफिकीरच संचारबंदीचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:27 AM2021-04-17T04:27:59+5:302021-04-17T04:27:59+5:30
संचारबंदीच्या काळात मेडिकल, दवाखाने, किराणा दुकान, बेकरी आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. त्याचाच फायदा घेत काही काम नसतानाही ...
संचारबंदीच्या काळात मेडिकल, दवाखाने, किराणा दुकान, बेकरी आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. त्याचाच फायदा घेत काही काम नसतानाही जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीची बतावणी करून अनेकजण बाहेर जात आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन व पोलीसही हैराण झाले आहेत. कोरोना बाधितांची शहरात संख्या वाढली असतानाही सर्व काही आलबेल असल्यागत संचारबंदी काळात सैराटसारखे फिरत आहे. यामुळे सजग नागरिकांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
मागील वर्षी लाकडाऊनदरम्यान राज्य व जिल्हा बंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक पूर्णत: ठप्प होती. मात्र आता वाहतूक व इतर काही प्रतिष्ठाने सुरू असल्याने सर्वत्र नागरिकांचा मुक्तसंचार दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी व पोलीस माघारी परतल्यावर परिस्थिती जैसे थे दिसून येते. शहरातील अनेक गल्लीबोळातील चौकाचौकात नागरिकांचा डेरा दिसून येत आहे. अशीच अवस्था तालुक्यातील गडचांदूर, नांदा, वनसडी, कवठाळा, पारडी या मोठ्या गावात दिसत आहे.
बॉक्स
१८ मार्चपर्यंत वैनगंगा बँक बंद
कोरपना येथील वैनगंगा बँकेतील एक कर्मचारी शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बँकेतर्फे १६ ते १८ मार्च या कालावधीत तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविले आहे.