प्रवासी वाहनातून सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:28 AM2021-07-29T04:28:41+5:302021-07-29T04:28:41+5:30

पोंभूर्णा : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विना मास्क असतात. याशिवाय वाहनात कोंबून प्रवासी बसविले जातात. ...

The fuss of social distance from a passenger vehicle | प्रवासी वाहनातून सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा

प्रवासी वाहनातून सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा

Next

पोंभूर्णा : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विना मास्क असतात. याशिवाय वाहनात कोंबून प्रवासी बसविले जातात. सोशल डिस्टंन्सिंग कुठेही पाळले जात नाही. असे असताना याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभूर्णा तालुक्यातील नांदगाव-गोंडपिपरी, पोंभूर्णा-चंद्रपूर मार्गावर हा प्रकार सुरू आहे.

केरोसीनचा पूरवठा करण्याची मागणी

नागभीड : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र, केरोसीन बंद झाल्याने अडचण जात आहे. केरोसीन पुरविण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुर्दशा

कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

वढोलीत पांदण रस्त्याची दैनावस्था

वढोली : बोरगाव पुलाकडून निघणारा ताराचंद कोपुलवार ते विश्वनाथ चूदरी यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्यावर खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य व मोठे खड्डे तयार झाले असून अवागमन करणाऱ्यांना त्रास होत आहे.

माणिकगड पहाडावर पर्यटनाला वाव

कोरपना : निसर्ग व वन संपदेने नटलेल्या माणिकगड परिसरात वन विभागाने पर्यटन सफारी सुरू करावी. तसेच येथील पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. यामुळे रोजगार मिळणार आहे.

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारले

ब्रह्मपुरी : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने जनसामान्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. सप्टेंबरपासून काही प्रमाणात सुरळीत सुरू झाले. परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढीला लागल्याने मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी महागाई वाढली आहे.

Web Title: The fuss of social distance from a passenger vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.