लालफितशाहित अडकला गडचांदूर- आदिलाबाद रेल्वमार्ग

By Admin | Published: November 27, 2014 11:30 PM2014-11-27T23:30:12+5:302014-11-27T23:30:12+5:30

जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरामधून जाणारा गडचांदूर- आदिलाबाद रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रेल्वेमार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या

Gadchandur - Adilabad railway route | लालफितशाहित अडकला गडचांदूर- आदिलाबाद रेल्वमार्ग

लालफितशाहित अडकला गडचांदूर- आदिलाबाद रेल्वमार्ग

googlenewsNext

लोकप्रतिनिधींचा संघर्ष व्यर्थ : २५ वर्षांपासून काम रखडलेले
लखमापूर : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरामधून जाणारा गडचांदूर- आदिलाबाद रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रेल्वेमार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची व स्थानिक नागरिकांची निराशा झाली आहे. विशेष म्हणजे, या मार्गासाठी आजवर अनेक लोकप्रतिनिधींनी संघर्ष केला. मात्र निधीच देण्यात न आल्याने २० ते २५ वर्षांपासून हा रेल्वेमार्ग लालफितशाहीतच अडून राहिला.
गेल्या अनेक वर्षांपासून सदर रेल्वेमार्गाची मागणी केली जात आहे. मात्र अद्यापही या मार्गाच्या कार्यास यश आलेले नाही. अर्थसंकल्पात निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य शासनाने ५० टक्के निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यापूर्वी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी तत्कालिन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे हा प्रश्न लावून धरला. त्यावेळी सदर मार्ग पूर्णत्वास येईल, असे आश्वासन त्यांना तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडून देण्यात आले होते. या क्षेत्रातील माजी आमदार विठ्ठलराव धोटे, प्रभाकरराव मामूलकर, अ‍ॅड. वामनराव चटप आदींनीही खटाटोप केला. मात्र केंद्रात यासाठी आवश्यक असलेला निधी न पुरवल्याने तब्बल २० ते २५ वर्षांपासून हा रेल्वे मार्ग दुर्लक्षितच आहे.
कोरपना तालुक्यात चार सिमेंट प्रकल्प आहे. यासाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक या सिमेंट कंपन्यांचा माल बल्लारपूर रेल्वे मार्गाने राज्यातील व देशातील कानाकोपऱ्यात जातो. यासाठी कंपन्या स्थापन होताच केंद्राने रेल्वे मार्गाची तात्काळ व्यवस्था केली. मात्र याचा लाभ प्रवाशी वाहतुकीसाठी झाला नाही. या भागात देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगार मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले आहे तर काही कायमस्वरुपी रहिवाशी झाले आहे. त्याचबरोबर सदर तालुका तेलंगणा सीमेलगत असल्याने जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी गडचांदूर- कोरपना येथून ५० ते ६० किलोमीटर अंतर कापून बल्लारपूर गाठावे लागते. यातून बस, खासगी चारचाकी वाहनाद्वारे प्रवास करावा लागत आहे. ज्यात एका व्यक्तीला साधारणत: ५० ते ७० रुपये खर्च येतो. याउलट कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना नांदेड तथा इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आदिलाबाद रेल्वे स्टेशनशिवाय पर्याय नाही. यात आर्थिक बोझा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रेल्वे मार्गाची सुविधा झाल्यास प्रवाशांना कमी खर्चात इतर देशात प्रवास करणे अधिक सोपे होईल. मात्र केंद्रीय मंत्रालयाने वा शासनाने आजपर्यंत या मागणीकटडे दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया जनमाणसात आता उमटू लागली आहे. गडचांदूर हे नगर परिषदेचा दर्जा मिळालेले या तालुक्यातील मध्यवर्ती शहर आहे. त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीने या मार्गाचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी काम पूर्णत्वास आणू, अशी ग्वाही जनतेला देतात. मात्र केंद्रातून निधी उपलब्ध करून देण्यास ते असमर्थ ठरत आहे. तेव्हा आता तरी लोकप्रतिनिधी ही मागणी पूर्ण करतील काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Gadchandur - Adilabad railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.