गडचांदूर शहर उद्यानांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:27 AM2021-03-06T04:27:42+5:302021-03-06T04:27:42+5:30
जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत विचार केल्यास गडचांदूर मागासलेला राहिल्याचे दिसून येते. कोरपना तालुक्याच्या मध्यभागी असल्याने व सिमेंट कंपन्यांचे जाळे ...
जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत विचार केल्यास गडचांदूर मागासलेला राहिल्याचे दिसून येते.
कोरपना तालुक्याच्या मध्यभागी असल्याने व सिमेंट कंपन्यांचे जाळे असल्यामुळे गडचांदूर शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. गडचांदूर गावाचे शहरात रूपांतर झाल्याला जवळपास सात वर्षे पूर्ण झाली आहेत. नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर शहर झपाट्याने विकसित होतील, अशी लोकांची आशा होती. मात्र, सिमेंट कॉंक्रीटीकरण वगळता काहीही नावीन्यपूर्ण कामे शहरात झालेली दिसून येत नाही.
बालकांना, महिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा करण्याकरिता शहरात २० ते २५ खुले भूखंड उपलब्ध असताना कुठेही उद्यान निर्माण करण्यात आले नाही. शहरवासियांना केवळ प्रदूषणयुक्त वातावरणात आपला वेळ काढावा लागतो. अनेक शहरांमध्ये नावीन्यपूर्ण कामे करण्यात आली असून उद्यानेसुद्धा विकसित करण्यात आली आहेत. मात्र, गडचांदूर हे उद्यानापासून वंचित असलेले शहर आहे.