गडचांदूरकरांचे तालुक्याचे स्वप्न अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:27+5:302021-02-08T04:24:27+5:30

चंद्रपूर : जिवती व कोरपना या दोन तालुक्यांची आर्थिक बाजारपेठ म्हणून गडचांदूर या शहराची ओळख आहे. दोन्ही तालुक्यातील एक ...

Gadchandurkar's dream of a taluka is unfulfilled | गडचांदूरकरांचे तालुक्याचे स्वप्न अपूर्णच

गडचांदूरकरांचे तालुक्याचे स्वप्न अपूर्णच

Next

चंद्रपूर : जिवती व कोरपना या दोन तालुक्यांची आर्थिक बाजारपेठ म्हणून गडचांदूर या शहराची ओळख आहे. दोन्ही तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ख्याती आहे. या शहराला तालुक्याची नितांत गरत असून, ४० ते ५० हजार असलेल्या या शहराभोवती अनेक गावे वसलेली आहेत. गडचांदूर तालुक्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू असून, नागरिक अद्याप प्रतीक्षेतच आहेत.

कोणत्याही कामानिमित्त सभोवतील अनेक गावांतील नागरिकांना सध्या कोरपना येथे विविध कामांसाठी जाणे-येणे करावे लागते. अतिदुर्गम भाग म्हणून कोरपना या तालुका जिल्ह्यात ओळखला जातो. वनसृष्टीने जिवती व कोरपना या दोन तालुक्यांना भरभरून दिले. हिरवाईचा शालू माणिकगड किल्ल्यांच्या पायथ्यापासून तर कोरपना पारडीपर्यंत नटलेला आहे. औद्योगिक क्षेत्रातील गडचांदूर शहराला आघडीला बसस्थानक तसेच रेल्वेची सुविधा नाही. सिमेंट या क्षेत्राला मिळालेली एक देणगीच. त्यामुळे गडचांदूर या शहराची सिमेंट सिटी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मात्र, शहराचा हवा तसा विकास झाला नाही. शहराला तालुक्याचा दर्जा मिळाल्यास अनेक सुविधा निर्माण होतील. सिमेंटचे चार कारखाने असूनसुद्धा परिसरात बेरोजगारी आहे. आजघडीला येथील अभियांत्रिकी केलेल्या शेकडो मुलांचे बस्तान परप्रांतात आहे. प्रदूषण आणि बेरोजगारी यामुळे येथील तरुण नाराज असल्याचे दिसते. भविष्यात हे शहर तालुका म्हणून उदयास आल्यास येथील तरुणांना विविध प्रकारचे रोजगार तसेच येथील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, कर्मचारी वर्गाला एकप्रकारे सोयीचे होईल. जिवती आणि कोरपना या तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून गडचांदूर तालुका होणे महत्त्वाचे आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन गडचांदूर तालुका निर्मितीला प्राधान्य देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले

कोरोनामुळे यावर्षी प्रत्येकाचे अर्थचक्र बिघडले. बाहेरगावी शिक्षण तसेच रोजगारासाठी गेलेले युवक शहरात परतले आहे. मात्र त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे स्थानिक कंपनीत काम देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, तालुक्याचा दर्जा मिळाल्यास विकाला गती येऊन या बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी आशा, नागरिकांना आहे.

Web Title: Gadchandurkar's dream of a taluka is unfulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.