विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
By admin | Published: June 28, 2014 11:29 PM2014-06-28T23:29:15+5:302014-06-28T23:29:15+5:30
स्पर्धेच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा त्यांना गावातीलच शाळांमध्ये सुविधा मिळाव्या यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र काही शाळा संचालक शाळेत कोणताही सुविधा न पुरविता
केवळ देखावा : शाळेत वीज नाही, संगणक, वाचनालय, लॅबचा पत्ता नाही
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
स्पर्धेच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा त्यांना गावातीलच शाळांमध्ये सुविधा मिळाव्या यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र काही शाळा संचालक शाळेत कोणताही सुविधा न पुरविता केवळ देखावा निर्माण करून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करीत आहे. विविध पळवाटा शोधून शासन तसेच अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करीत आहे.
कोरपना तालुक्यातील आदर्श ग्राम विकास सेवा मंडळ पिपर्डाद्वारे संचालित कढोली येथील दगडोजीराव देशमुख विद्यालयात असाच प्रकार सुरु असून येथील विद्यार्थ्यांचे भविष्य आता अंधारात आहे.
गडचांदूर येथून जवळच असलेल्या कढोली येथील या शाळेमध्ये अनेक असुविधा आहे. भारत २०२० मध्ये महासत्ता बनण्याचे स्वप्न बघत असताना या शाळेमध्ये अद्यापही साधा वीज पुरवठा नाही. त्यामुळे अन्य सुविधांचा प्रश्नच नाही. आरटी अॅक्टनुसार येथे सोयी विद्यार्थ्यांना पुरविल्या जात नसल्याचे शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या शाळेत वीज पुरवठा नाही. तसेच अन्य साधनांद्वारे कोणत्याही प्रकारे वीज उपलब्ध नसताना दहाव्या वर्गात आयटीसी हा संगणकासंबंधातील विषय विद्यार्थ्यांना कसा काय शिकविल्या जात असेल, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हा विषय आठवड्यातून दोन दिवस शिकविणे गरजेचे आहे. त्यातही प्रात्याक्षिकावर अधिक भर देणे महत्त्वाचे आहे. मात्र हा विषय मुळीच शिकविल्या जात नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. शाळा परिसरात प्रवेश करण्यासाठी साधा रस्ता नाही, टिनाचे शेड असलेल्या या शाळेमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नाही. संरक्षण भिंत नसल्यागत आहे. प्रयोगशाळा आहे मात्र त्यातील साहित्य गायब आहे. वाचनालय केवळ नापूरते आहे. यामध्ये केवळ अडगळीत साहित्य टाकून ठेवण्यात आले आहे. शौचालयाची स्थिती तर याहूनही बिकट आहे. येथे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थी उघड्यावर शौचास जात असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. पाण्याची सोय असली तरी ती विद्यार्थ्यांना त्रासदायक आहे. एक ना अनेक समस्या असलेल्या या शाळेमध्ये विद्यार्थी कसेबसे शिक्षण घेत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे उद्याचे भविष्य काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी केलेल्या शाळा तपासनीमध्ये उपशिक्षणाधिकारी टेंभुर्णे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक फटिंग, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक एस.एम. कोळवती आदी उपस्थित होते.