गांधी मार्र्ग सर्वाधिक महाग क्षेत्र

By admin | Published: January 5, 2015 10:59 PM2015-01-05T22:59:39+5:302015-01-05T22:59:39+5:30

नव्या वर्षात घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना आता रेडीरेकनरच्या (बाजार मूल्य) दर वाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. राज्य शासनाने १ जानेवारीला रेडीरेकनरच्या दरात १० ते १२

Gandhi Marrg is the most expensive area | गांधी मार्र्ग सर्वाधिक महाग क्षेत्र

गांधी मार्र्ग सर्वाधिक महाग क्षेत्र

Next

रेडीरेकनरच्या दरवाढीचा फटका
मंगेश भांडेकर -चंद्रपूर
नव्या वर्षात घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना आता रेडीरेकनरच्या (बाजार मूल्य) दर वाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. राज्य शासनाने १ जानेवारीला रेडीरेकनरच्या दरात १० ते १२ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे दरवाढीचा अडथळा दूर करूनच घर, प्लॉट, जमीन खरेदी करावी लागणार आहे. चंद्रपूर शहरात सर्वाधिक महागाई असलेला भाग महात्मा गांधी मार्ग असून सर्वात स्वस्त भाग कॉलरी क्षेत्र आहे.
राज्य शासन दरवर्षी १ जानेवारीला रेडीरेकनरचे दर जाहीर करत असते. यावर्षी दर जाहीर करण्यात आले असून हे दर सर्वत्र लागू करण्यात आले आहे. शहरातील काही भागात नव्या दरानुसार १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे घर, जमीन, दुकान खरेदी मुद्रांकाचा खर्च खरेदीदारांनाच करावा लागणार असल्याने दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. खुली जमीन, निवासी इमारत, वरचा मजला, तळ मजला, व्यावसायिक दुकान चाळीचे दर वाढले असल्याने ग्राहकांचीच चांगलीच कसरत होणार आहे. नव्या दरानुसार जिल्हा निबंधक कार्यालयात दर आकारले जात आहेत. यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे कोरडा दुष्काळाची स्थिती राज्यात निर्माण झाली. त्यामुळे महागाई थोडी कमी होईल, असे अनेकांना वाटत होते. नव्या वर्षात घर घेण्याचे अनेकांनी नियोजन केले. मात्र दर वाढल्याने घर चांगलीच कसरत होणार आहे.
प्लॉटिंग व्यावसायिकांची चांदी
प्लॉटिंगच्या व्यवसायातून रातोरात लखपती होण्याची किमया अनेकांनी साधली आहे. प्लॉट, घर खरेदी-विक्री करताना अनामत रक्कम देवून नोंदणीकृत खरेदीखत केले जाते. या खरेदीच्या आधारे आणखी तीन व्यवहार ग्राह्य मानले जातात. ही बाब लक्षात घेता, प्लॉटींग व्यावसायिक एखाद्याच्या मालमत्तेचे खरेदीखत करून त्या मुदतीत गरजू ग्राहक शोधतात. खरेदी केलेल्या दरापेक्षा एक ते दीडपट अधिक नफा कमावत सदर मालमत्तेचे हस्तांतरण केले जाते. खरेदी-विक्रीत कोणतीही गुंतवणूक न करता विकणारा व विकत घेणाऱ्या व्यक्तीशी समन्वय साधून कमीशन
तसेच दरातील तफावतीची रक्कम लाखोंच्या घरात जाते. त्यामुळे खरेदी-विक्रीतून कोणाला नफा होवो अथवा न होवो प्लॉटींग व्यावसायिकांची चांदी होते. प्लॉटींगच्या व्यवसायातील नफा लक्षात घेता अनेकांनी हा व्यवसाय जोडधंदा म्हणून सुरु केला आहे.
डिसेंबर महिन्यात सर्वाधिक व्यवहार
नव वर्षाच्या सुरुवातीला रेडीरेकनरचे दर वाढणार आहे, अशी ज्यांना माहिती होती. त्यांनी डिसेंबर महिन्यातच व्यवहार उरकून घेतले. त्यामुळे वर्षभराच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात जिल्ह्याभरात २ हजार २२९ खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. यात सर्वाधिक ६२९ व्यवहार चंद्रपूर तालुक्यात झाले. डिसेंबर २०१३ मध्ये २ हजार १४५ व्यवहार झाले होते. दरवर्षी हिच स्थिती दिसून येत असल्याचे जिल्हा निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Gandhi Marrg is the most expensive area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.