कचरा वेचणारा रामलू ‘स्वच्छता दूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:27 PM2017-12-27T23:27:40+5:302017-12-27T23:27:59+5:30

संसर्गजन्य रोग होणाऱ्या विविध घटकांना स्पर्श करुन ते आपली दैनंदिनी सुरु करतात.

Garbage collector Ramalu 'Sanitary messenger' | कचरा वेचणारा रामलू ‘स्वच्छता दूत’

कचरा वेचणारा रामलू ‘स्वच्छता दूत’

Next
ठळक मुद्देप्रेरणादायी उपक्रम : पालिकेकडून कचरा वेचणाऱ्यांचा सत्कार

सचिन सरपटवार ।
आॅनलाईन लोकमत
भद्रावती : संसर्गजन्य रोग होणाऱ्या विविध घटकांना स्पर्श करुन ते आपली दैनंदिनी सुरु करतात. प्लॅस्टिक, बॉटल्स, भंगार हेच त्यांचे सखेसोबती आणि उदनिर्वाहाचे साधनही. आपल्या कामाच्या वस्तू वेचत कायम उकीरड्यावर दिसणारा रामलू गटावार आज भद्रावती शहरातील स्वच्छता दूत झाला आहे.
आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कचरा उचलणाऱ्या किंवा घरोघरी जाऊन तो संकलित करणाऱ्या व्यक्ती स्वच्छतेबाबत अतिशय मोलाची भूमिका वटवित आहेत. ज्या ठिकाणी भटकी कुत्रे, डुकरे, जनावरे सातत्याने वास्तव्य करतात. अशा उकीरड्यावर कचरा वेचणाºया व स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या रामलू गटावार याला भद्रावती नगर परिषदेतर्फे स्वच्छता दूत म्हणून घोषित करण्यात आले असून नुकताच त्याचा सत्कारही करण्यात आला. सुशिक्षित समाज कचरा निर्माण करतो अन् अशिक्षित समाज त्या कचऱ्याचे निर्मूलन करुन सुशिक्षांताना स्वच्छतेचा धडा देतो, असे काहिसे चित्र याप्रसंगी पाहायला मिळाले. साधारणता नट, नट्या, नामांकित व्यक्तींना स्वच्छता दूत करण्यात येते. पण कचरा वेचणाऱ्या रामलुला स्वच्छता दूत बनवून भद्रावती न.प. ने एक आदर्श घडवून आणला आहे. भद्रावती न.प. द्वारे भंगार, कचरा वेचणाऱ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना ओळखपत्रे देण्यात आली. शहरातील कचरा उचलणाऱ्या १२ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. शहरातील प्लॅस्टिक वेचण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले असून त्यांनी जमा केलेले प्लॅस्टिक न.प. विकत घेणार आहे. त्याचे आकारमान कमी करुन मशिनद्वारे बंडल बांधून ठेवण्यात आले आहे. रामलू गटावार, दुर्गा वाघामरे, गणपत घोडमारे, मारोती घोडमारे, मिरा घोडमारे, चरणदास ढोके, बेबी वाघमारे, राम मांजरे, सुरज वाघमारे, सावंत वाघमारे, सविता वाघमारे, राम मंजूळकर ही त्यांची नावे आहेत. पालिकेने त्यांचा सत्कारसोहळा आयोजित करून नवा आदर्शच समोर ठेवला. पहिल्यांदाच कचरा वेचणारे मोठ्या व्यासपिठावर उपस्थित झाले होते. प्रत्येकांचे चेहरे भांबावलेले होते. कुणाच्या हातात १५ दिवसांचे बाळ होते तर कुणाचा पायात साधी चप्पलही नव्हती. एक मुलगा तर पॅन्ट न घातलेलाच दिसून आला. या सर्वांचे मन मात्र अगदी स्वच्छ होते. स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात आधी आपले मन स्वच्छ करावे, असा संदेशही या सत्कार सोहळ्यातून देण्यात आला. नगर परिषद भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव, प्रा. संजय आसेकर यांच्या हस्ते सर्वांना गौरविण्यात आले.

Web Title: Garbage collector Ramalu 'Sanitary messenger'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.