पंचायत समिती सभापती निवासस्थान बनले कचराकुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:12+5:302021-09-02T04:59:12+5:30
भद्रावती : ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण व्हावे, यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात सभापती निवास बांधण्यात आले. मात्र, या ...
भद्रावती : ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण व्हावे, यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात सभापती निवास बांधण्यात आले. मात्र, या निवासस्थानाचा फायदा सभापती घेत नसल्याने हा परिसर कचऱ्याने व्यापला आहे. येथील नागरिक याचा कचराकुंडी म्हणून वापर करत आहे. याकडे मात्र पंचायत समिती विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.
पंचायत समिती निर्मितीनंतर १९६२ पासून २०२१पर्यंत तब्बल १८ सभापतींनी आपला पदभार सांभाळला आहे. नाजुका सुरेश मंगाम यांची १ जानेवारी २०२० ला सभापतिपदी निवड झाली. मात्र, त्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना महिनाभरात सभापती पद सोडावे लागले. त्यानंतर या पदावर प्रवीण ठेंगणे यांची प्रभारी सभापतिपदी निवड करण्यात आली. हे प्रभारी म्हणूनच सभापतिपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. १९६२ ते २००० पर्यंत ५० वर्षांच्या कार्यकाळात सभापतीसाठी निवासस्थान नव्हते. त्याकरिता शासनस्तरावर मागणी केल्याने पंचायत समिती स्तरावर २००० नंतर सभापती निवास बांधण्यात आले. ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी, कामगार, इतर नागरिक पंचायत समितीमध्ये विविध योजनांसाठी, तसेच इतर कामांसाठी येत असतात. त्यांचे कामकाज योग्यरीतीने पार पडावे. ही सर्वस्व जबाबदारी त्या भागातील सदस्य, तसेच सभापती यांची असते. या समस्या लक्षात घेता सभापती हा मुख्यालयी असायला पाहिजे, यासाठी पंचायत समितीच्या परिसरात सभापती निवास बांधण्यात आले. या २० वर्षाच्या कार्यकाळात एक दोन सभापती सोडले, तर इतर कोणीही निवासस्थानी कधीही राहिलेले नाही.
कोट
सभापती निवास सभापतीसाठी राहण्यासाठी आहे त्यांनी त्यांचा वापर करावा. आम्ही अधिकारीवर्ग त्यांना राहणे बंधनकारक करू शकत नाही.
- मंगेश आरेवार, गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती.
कोट
काही सभापतींनी या निवासस्थानाचा वापर केला आहे. मी प्रभारी सभापती आहे. तसेच माझे गाव हे जवळच आहे. हे सभापती निवासस्थान स्वच्छ करून येथे महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय देण्याचे ठरविण्यात आले आहे.
-प्रवीण ठेंगणे, प्रभारी सभापती पंचायत समिती, भद्रावती.
310821\img_20210831_150707.jpg~310821\img_20210804_120020.jpg
पंचायत समिती सभापती निवास स्थान बनले कचराकुंडी~पंचायत समिती सभापती निवास स्थान बनले कचराकुंडी