कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:09+5:302021-07-10T04:20:09+5:30
चंद्रपूर शहरात डुकरांचा उपद्रव वाढला चंद्रपूर : शहरातील तुळशीनगर, वृंदावननगर, बाबूपेठ, संजयनगर परिसरामध्ये डुकरांचा उपद्रव वाढला आहे. अनेक वॉर्डांत ...
चंद्रपूर शहरात डुकरांचा उपद्रव वाढला
चंद्रपूर : शहरातील तुळशीनगर, वृंदावननगर, बाबूपेठ, संजयनगर परिसरामध्ये डुकरांचा उपद्रव वाढला आहे. अनेक वॉर्डांत डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डुकरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री
चंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांचा विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले, तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
भुरट्या चोरींच्या घटनांत वाढ
चंद्रपूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरासमोर ठेवलेले साहित्य सुरक्षित राहीलच, याची कोणतीही खात्री नाही. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .
नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी
चंद्रपूर : पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील काही नाल्या तुडुंब भरल्या आहेत. विशेषत: नाल्यांमध्ये कचरा तुंबल्यामुळे या नाल्यांचे पाणी रस्त्यांवर येत आहे. त्यामुळे वार्डनिहाय नाल्यांच्या स्वच्छतेचे नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यापूर्वीच महापालिकेने नाल्यांची स्वच्छता आरंभली होती. मात्र, काही नाल्यांची स्वच्छता केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
निराधार योजनेचे अनुदान द्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावात चार ते पाच महिन्यांपासून श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान थकीत आहे. परिणामी, लाभार्थ्यांना अडचण जात आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने लाभार्थ्यांना आर्थिककोंडी होत आहे. लाभार्थी बँकेत पैशासाठी चकरा मारत आहेत.