पेट्या असतानाही कचरा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:36+5:30
सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी शासनकाकडून मोठ्या प्रमाणात योजनाही राबविण्यात येत आहेत. दररोज प्रत्येक घरोघरी कचरा संकलित करण्यासाठी कचरा गाडी जात आहे. परंतु, शहरातील बºयाच वॉर्डांमध्ये प्लास्टिक कचरा पसरलेला दिसतो. यामुळे प्रशासनाप्रती रोष व्यक्त होणे स्वाभाविक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात महानगरपालिकेद्वारे प्रत्येक चौक व वॉर्डात कचराकुंड्या ठेवून नागरिकांना कचरा टाकण्याची सुविधा तयार करून दिली. तसेच नियमीत घंटागाडीसुद्धा फिरत असते. मात्र नगीनाबाग परिसरात गुरांच्या दवाखान्याजवळ, चोर खिडकीजवळ, तसेच जुन्या आरटीओ आॅफीसच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या अनास्थेमुळे स्वच्छ सुंदर योजनेला हरताड फासल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी शासनकाकडून मोठ्या प्रमाणात योजनाही राबविण्यात येत आहेत. दररोज प्रत्येक घरोघरी कचरा संकलित करण्यासाठी कचरा गाडी जात आहे. परंतु, शहरातील बºयाच वॉर्डांमध्ये प्लास्टिक कचरा पसरलेला दिसतो. यामुळे प्रशासनाप्रती रोष व्यक्त होणे स्वाभाविक आहे. पंरतु, काही नागरिकच शहरात कचºयाचे उकिरडे तयार करताना दिसतात. पेट्या असताना रस्त्याच्या कडेला कचरा टाकून जबाबदारी टाळतात. शहरातील बहुतेक ठिकाणी कचरा पेट्या आहेत. त्याकडे लक्ष न दिल्याने सभोवताल कचरा दिसून येतो.
यामध्ये सुमारे ४० टक्के कचरा प्लास्टिकचा असतो. काही वॉर्डात कचरा टाकण्याची सुविधा नाही. यामुळे त्या भागातील नागरिक आम्ही कचरा टाकावा कुठे, असा प्रश्न उपस्थित करतात. जेथे अनेक दिवसांपासून कचरा टाकण्याची सोय आहे तेथे पेटीत न टाकता बाहेर टाकला जात आहे. यातून दुर्गंधी पसरते आणि परिसराला अवकळा येते. महानगरपालिकेद्वारे पेट्यातून कचरा काढून त्याची विल्हेवाट लावली जाते. कचरा टाकण्याची सुविधा असताना काही नागरिक योग्य त्या जागी टाकत नसल्याने दंड आकारण्याची मागणी केली जात आहे.
कचरा पेट्यांच्या सभोवतालचा भाग दुर्गंधीयुक्त झाल्याचे शहरातीत अनेक वॉर्डांत पाहावयाला मिळत आहे. नागरिकांनी कचरा नियोजित जागेतच टाकण्याची सवय पाडणे गरजेचे आहे. मनपा प्रशासनाने शहर स्वच्छतेची मोहीम प्रभावीपणे राबवत असताना सामाजिक दायित्व न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
प्लास्टिकमुळे धोका
शहरात कचराकुंड्याजवळ प्लास्टिकचा कचरा पाहून मोकाट जनावरे अन्नाच्या शोधात उकिरड्यावर उच्छाद मांडतात. मोकाट जनावरांच्या पोटात घातक प्लास्टिक जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिक पोटात गेल्याने काही जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनी पेट्यांबाहेर कचरा टाकू नये. शहरातील विविध वॉर्डात ठेवलेल्या कचराकुंड्यांची निगा राखून इतरांनाही त्यात कचरा टाकण्यास प्रोत्साहन द्यावे.
डासांचा प्रादुर्भाव
शहरात अनेक ठिकाणी कचरा साचत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यातून डासांचे प्रमाण वाढले. नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरच टाकलेले प्लास्टिक उडून इतरत्र पसरतात. त्यातील काही नाल्यांमध्येही जातात. यामुळे सांडपाण्याचा प्रवाह अवरुद्ध होतो. परिणामी, डासांचा प्रादुर्भाव वाढून गंभीर आजारांचा प्रसार होत असल्याचे दिसते. काही नाल्यांवर झाकणे बसविण्यात आले नाही.