तलावाच्या पाळीवर फुलली विविध वृक्षाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:28 AM2021-09-03T04:28:46+5:302021-09-03T04:28:46+5:30

रोजगार हमी योजनेअंतर्गत झाले काम पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीतील सोनापूर गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत मामा तलावाच्या काठावर ...

A garden of various trees bloomed on the banks of the lake | तलावाच्या पाळीवर फुलली विविध वृक्षाची बाग

तलावाच्या पाळीवर फुलली विविध वृक्षाची बाग

Next

रोजगार हमी योजनेअंतर्गत झाले काम

पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीतील सोनापूर गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत मामा तलावाच्या काठावर विविध वृक्षाची लागवड करून वृक्षाचे वन फुलले आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आष्टा ग्रामपंचायतीतील सोनापूर गावात मामा तलावाच्या काठावर ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. २०१९-२० या वर्षी लावण्यात आलेले विविध जातींचे ४०० वृक्ष आजमितीस पूर्णपणे जिवंत असून रोजगार सेवक व दोन महिला कामगार वृक्ष संगोपन करीत आहेत. दोन वर्षांच्या वृक्ष संवर्धनातील वृक्ष १५ फुटांपर्यंत वाढलेली आहेत. तलावाच्या पाळीवर तलावाचा गाळ टाकला असल्याने वृक् वाढ झपाट्याने होत आहे. तालुक्यात या वृक्ष संगोपनाची चर्चा असून अनेक लोक या कामाला भेट देत आहेत. कामाचे नियोजन व वृक्षसंवर्धनाचे काम पाहण्यासाठी तहसीलदार डॉ. नीलेश खटके, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोले, रोजगार हमीचे सहायक कार्यक्रम अधिकारी हेमंत येरमे, तांत्रिक सहायक सतीश वाढई यांनी भेट दिली. यावेळी आष्टा ग्रामपंचायतच्या सरपंच किरण डाखरे, रोजगार सेवक सुरेश दिवसे उपस्थित होते.

020921\img20210902162428.jpg

सोनापूर तलावाच्या पारीवर फुलली विविध वृक्षाची बन

Web Title: A garden of various trees bloomed on the banks of the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.