१७५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:45 PM2017-12-06T23:45:27+5:302017-12-06T23:45:58+5:30

मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर अंतर्गत बल्लारपूर वनपरिक्षेत्राच्या कळमना उपवनक्षेत्रातील पळसगाव येथील १७५ लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर गॅस कनेक्शनचे वितरण मंगळवारी करण्यात आले.

Gas connection to 175 beneficiaries | १७५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन

१७५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन

Next
ठळक मुद्देकळमना उपवनक्षेत्र : ७५ टक्के अनुदान

आॅनलाईन लोकमत
कोठारी : मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर अंतर्गत बल्लारपूर वनपरिक्षेत्राच्या कळमना उपवनक्षेत्रातील पळसगाव येथील १७५ लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर गॅस कनेक्शनचे वितरण मंगळवारी करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन बल्लारपूर पंचायत समिती उपसभापती इंदिरा पिपरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य वैशाली बुद्धलवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं. सदस्य सुचिता गाले, क्षेत्रसहाय्यक कळमणा पी. एस. झाडे व वनरक्षक एम. ए. धुर्वे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील व जंगलाशेजारी असणाऱ्यां महिलांना जंगलात सरपणासाठी भटकावे लागते. अशातच जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात महिलांचा बळी जातो. त्यामुळे त्यावर प्रतिबंध व्हावा, यासाठी राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मॉडल ग्राम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्यातील आठ, मूल १३, पोंभुर्णा सात व बल्लारपूर तालुक्यातील एक असे एकूण २९ गावांची निवड करण्यात आली आहे. त्या गावातील गरजूंना ७५ टक्के अनुदानावर गॅस कनेक्शन देण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे.
त्यानुसार गॅसचे वितरण करण्यात आले.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर गॅस भरण्यासाठी वनविभागातर्फे ३०८ रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्रसहाय्यक झाडे यांनी दिली.

Web Title: Gas connection to 175 beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.