गॅस सिलिंडरला लागली आग

By admin | Published: September 12, 2016 12:42 AM2016-09-12T00:42:04+5:302016-09-12T00:42:04+5:30

शहरातील खंजी वॉर्ड येथील रहिवासी रमेश बोधे यांच्या घरी गणेशजींच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमादरम्यान स्वयंपाक सुरु असतांना...

Gas cylinders fire | गॅस सिलिंडरला लागली आग

गॅस सिलिंडरला लागली आग

Next

वरोऱ्यातील घटना : नागरिकांच्या समयसूचकतेने मोठी हानी टळली 
वरोरा : शहरातील खंजी वॉर्ड येथील रहिवासी रमेश बोधे यांच्या घरी गणेशजींच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमादरम्यान स्वयंपाक सुरु असतांना गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. नागरिकांच्या समयसूचकतेने मोठी दुर्घटना टळली .
खंजी वॉर्डातील बोधे कुटुंबाच्या घरी गणपती निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करीत होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरा शेजारील कुटुंब या कार्यक्रमामध्ये सामील होते. त्या वेळेस घरघुती गॅस सिलिंडर सुरू केले असता अचानक आग लागली. या आगीमुळे एकाच घाबरगुंडी उडाली. या वेळेस वॉर्डातील सुज्ञ नागरिकांनी समयसूचकता दाखवून सदर सिलिंडरला बाजूला करून त्यावर ओले पोते टाकले. त्यानंतर समोरच्या मोकळ्या पटांगणातील पाण्याच्या डबक्यामध्ये सिलिंडर नेऊन टाकले. त्यामुळे ती आग विझली. परंतु तरीही मोठा स्फोट तर होणार नाही ना, या भीतीने नागरिकांनी त्वरित वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास दूरध्वनीवरून कळविले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटना स्थळ गाठून सदर सिलेंडरला विझवण्यात आले. त्यानंतर त्या सिलिंडरमधून गॅसचे बुडबुडे पाण्यात दिसू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसूरकर, पोलीस उपनिरीक्षक मुत्तेपोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनेदरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित घातल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. त्याची माहिती मीनाक्षी गॅस एजंसी यांना देण्यात आली. तेथील कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर सिलिंडरला आग कशी लागली, याचा शोध एच. पी. कंपनीचे कर्मचारी घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gas cylinders fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.