गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले, आता मोजा ९०७ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:09+5:302021-08-21T04:32:09+5:30
एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असतानाच दुसरीकडे सबसिडी कमी केली जात आहे. मागील आठ महिन्यामध्ये गॅस सिलिंडरचे भाव १६५ रुपयांनी ...
एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असतानाच दुसरीकडे सबसिडी कमी केली जात आहे. मागील आठ महिन्यामध्ये गॅस सिलिंडरचे भाव १६५ रुपयांनी वाढले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता महागाईमुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. सिलिंडर भरल्याशिवाय पर्यायच नसल्याने आर्थिक तडजोड करून सामान्य नागरिक गरज भागवित आहे.
बाॅक्स
व्यावसायिक सिलिंडर पाच रुपयांनी स्वस्त
घरगुती सिलिंडरसोबतच व्यावसायिक सिलिंडरचीही मागणी मोठ्या प्रमाणात असते. कोरोना काळात व्यावसायिक सिलिंडरची मागणी कमी झाली होती. व्यावसायिक सिलिंडर पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. मागील काही दिवसांमध्ये या सिलिंडरचे दर १ हजार ७५२ रुपये होते. सध्या स्थितीत ते १ हजार ७४७ रुपयांनी मिळत आहे.
बाॅक्स
छोट्या सिलिंडरचे दर उतरले
जिल्ह्यात घरगुती तसेच व्यावसायिक सिलिंडरप्रमाणे छोट्या सिलिंडरलाही मागणी आहे. सद्यस्थितीत पाच किलोचा छोटा सिलिंडर ४०० रुपयांना मिळत आहे. घरगुती गॅसच्या किमती २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र छोट्या सिलिंडरच्या दरात सध्या तरी वाढ झाली नाही.
बाॅक्स
आठ महिन्यात १६५ रुपयांची दरवाढ
महिना दर
जानेवारी ७४२
फेब्रुवारी ८१७
मार्च ८६७
जून ८५७
जुलै ८८२.५०
ऑगस्ट ९०७.५०
बाॅक्स
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
जानेवारी महिन्यामध्ये ७४२ रुपयांमध्ये मिळणारे घरगुती सिलिंडर ऑगस्ट महिन्यामध्ये ९०७ रुपये ५० पैशांवर पोहोचले आहे. मात्र सबसिडी कमी केली जात आहे. पूर्वी गॅस सिलिंडर शासनाकडून २०० रुपये २५० रुपये सबसिडी दिसली जायची. मात्र गेल्या दीड वर्षांपासून केवळ ४० रुपये नाममात्र सबसिडी दिली जात आहे. बऱ्याच ग्राहकांच्या खात्यात ही सबसिडी जमा होत नसल्याची ओरड आहे.
बाॅक्स
शहरात चुली कशा पेटवायच्या?
केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजनेतून घराघरात गॅस सिलिंडर पोहोचविला आहे. महिलांच्या आरोग्यासाठी ही योजना चांगली आहे. आता सिलिंडरच्या किमती वाढवून पुन्हा महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आणली आहे. सरपणही मिळत नाही, जंगलात जाण्याची परवानगी नाही, अशावेळी महिलांनी काय करायचे, हा प्रश्न आहे.
- मीरा रामटेके
बाॅक्स
मागील काही दिवसांपासून सिलिंडरचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कसे जगावे, हा प्रश्न आहे. सिलिंडरचे दर वाढवायचे होते तर उज्ज्वलाची योजना सुरू करून महिलांना सिलिंडरवर स्वयंपाक करण्याची सवय का लावली. पूर्वी त्या चुलीवर स्वयंपाक करतच होत्या.
- रिना सिडाम