राजुरा येथे प्रवेशद्वार सजावट स्पर्धा
By admin | Published: October 4, 2015 01:56 AM2015-10-04T01:56:41+5:302015-10-04T01:56:41+5:30
लोकमत सखी मंच राजुराच्या वतीने ४ आॅक्टोबरला दुपारी २ वाजता किसान भवन राजुरा येथे राजुरा शहरातील महिलांसाठी प्रवेशद्वार सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सखी मंचचा उपक्रम : सहभागी होण्याचे आवाहन
राजुरा : लोकमत सखी मंच राजुराच्या वतीने ४ आॅक्टोबरला दुपारी २ वाजता किसान भवन राजुरा येथे राजुरा शहरातील महिलांसाठी प्रवेशद्वार सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात तोरण आणि रांगोळी काढून प्रवेशद्वार सजावट करणे, तर वन मिनीट शो अशा दोन स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेचे बक्षिस वितरण स्पर्धेनंतर करण्यात येणार आहे.
दारी तोरण आंब्यांचे घोतक आहे, मांगल्याचे रंगीत रांगोळी रेखानी जीवनी रंग भरावे, या उक्तीप्रमाणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी नृत्यांगणा अखिलेशा पाटील यांच्या नृत्यांचा धमाका आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला राजुरा, सास्ती, लक्कडकोट परिसरातील सखी मंच सभासदांनी उपस्थित राहावे अशी विनंती तालुका संयोजिका जयश्री देशपांडे, शहर संयोजिका कृतिका सोनटक्के (९९२२९३०१५१), सास्ती संयोजिका संध्या पत्तेवार (९६२३८२९९८६), आयोजक रिता पाटील (८०७६७९४५४) यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)
मूल येथे हेअर स्टाईल व स्क्रीन केअर प्रशिक्षण
मूल : लोकमत सखी मंच मूल व हनी ब्युटी पार्लर मूल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारच्या हेअर स्टाईल प्रशिक्षण व चेहऱ्याची निगा यावर ४ आॅक्टोबर रोजी रविवारी दुपारी १ वाजता जनकल्याण शिक्षण संस्था मूलच्या कार्यालयात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात थ्री रोल पोनीटेल, पाकळी वेणी, थ्री रोल जुडा, बटर फ्लाय, ऐटरोल, झुला चोटी, फ्रीश बोन, फ्रेंच जुडा, जपानी जुडा, ऐट आकाराचा जुडा, वनसाईड सागर वेणी, गो-गो स्टाईल, सागर जुडा, वनरोल जुडा, सेवनरोल जुडा, जीलेबी जुडा व शर्मीला जुडा व सौंदर्याची निगा कशीस राखावी याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात १ मिनीट शो चे आयोजन केले जाणार आहे. तसेच दुपारी २ वाजेपर्यंत प्रवेश घेणाऱ्या महिलांचा ‘लक्की ड्रॉ’ समावेश करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाकरिता सखी मंच सदस्यासाठी २० रुपये व इतर महिलांसाठी ३० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा व अधिक माहितीसाठी तालुका संयोजिका जयश्री चन्नुरवार (९४०५५०३८९९), संजिवनी वाघरे (९४२०४२३५८७) यांचेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.