सामान्य नागरिकांनी चीनविरोधात लढा उभारला पाहिजे -गोविंदाचार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:42 PM2017-08-21T22:42:32+5:302017-08-21T22:42:49+5:30
भारतातील सामान्य नागरिकांनी चीनविरोधात सामाजिक लढा उभारला पाहिजे, व चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे,
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतातील सामान्य नागरिकांनी चीनविरोधात सामाजिक लढा उभारला पाहिजे, व चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वाभिमानी आंदोलनाचे संस्थापक, संरक्षक के. एन. गोविंदाचार्य यांनी केले.
चंद्रपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वदेशी जागरण मंचाचे प्रमुख प्रा. अजय पत्की, राष्टÑीय संयोजक पवनकुमार श्रीवास्तव, राष्टÑीय संघटन मंत्री बसवराज पाटील, युवा नेता सुरक्षा सेल प्रमुख अभिमन्यू कोहाड, सहसंयोजक राजश्री चौधरी, राष्टÑीय मंत्री, प्रदीप नागपुरकर, भुला महाजन, चंद्रपूर सामाजिक कार्यकर्ते रविंद्र तिराणीक आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते तसचे विदर्भ प्रचारक भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनाचे प्रमुख रवींद्र तिराणिक म्हणाले, चीनसारख्या राष्टÑाशी सीमेवर आपले सैन्य दोन हात करीत आहे. त्यांच्या जोडीने नागरिकांनीही चीन विरोधात लढ्यात सहभागी झाले पाहिजे, व चीनला धडा शिकवला पाहिजे. असे ते म्हणाले.
यावेळी चिनी मालाची होळी करण्यात आली. त्यानंतर राष्टÑीय स्वाभीमान आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना गोविंदाचार्य म्हणाले, कोणत्याही देशाची ताकद ही त्या देशातील नागरिकांच्या व्यक्तिमत्वावर ठरते. देशातील नागरिक एकत्रित आणि ताकदवान असतील. तर देश ताकदवान राहतो. चीनचा सर्वकष अभ्यास करुन चिनविरोधी धोरणासाठी सामाजिक रणनिती आखणे आवश्यक आहे. सीमास्तरावर आयुधांचा मदतीने लढाई करता येईल मात्र, सामाजिक स्तरावरील लढाईसाठी सामाजाची एकता आवश्यक आहे. भारतातील सामान्य नागरीकांनी सैन्यासोबत सामाजिक लढा दिला तर चीनला देखील आपण डोईजड होऊ शकतो. चीनचा वेग आहे. तर भारताकडे क्षमता आहे. कोणत्याही स्पर्धेत टिकण्यासाठी वेग नाही, तर क्षमतेची गरज असते. हिच क्षमता टिकवून भारताला चीनविरोधी लढा द्यायचा आहे. असे ते म्हणाले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन बसवराज पाटील प्रास्ताविक अभिमन्यू कोहाड तर उपस्थिताचे आभार पवनकुमार श्रिवास्तव यांनी मानले. यावेळी अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.