नऊ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक
By admin | Published: July 26, 2016 01:03 AM2016-07-26T01:03:28+5:302016-07-26T01:03:28+5:30
जिल्ह्यातील सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ मध्ये मुदत संपणाऱ्या राजुरा, जिवती, सिंदेवाही व मूल तालुक्यातील ...
७९ ग्रा. पं. मध्ये पोटनिवडणूक : २४ आॅगस्टला मतदान
चंद्रपूर : जिल्ह्यातील सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ मध्ये मुदत संपणाऱ्या राजुरा, जिवती, सिंदेवाही व मूल तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा व ७९ ग्रामपंचायतीमधील ११९ रिक्त जागांसाठी पोट निवडणूकीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम आयोगाने घोषित केला आहे. ९ ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतमधील पोट निवडणूकीसाठी २४ आॅगस्टला मतदान होणार आहे.
निवडणूकांची नोटीस प्रसिध्द करण्याची तारीख २५ जुलै असून नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा ३ आॅगस्ट ते ९ आॅगस्ट दरम्यान सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत राहणार आहे. १० आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. १२ आॅगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्ह तसेच अंतिम रित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी १२ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेनंतर प्रसिध्द करण्यात येईल. २४ आॅगस्टला मतदान होईल तर मतमोजणी २६ आॅगस्ट रोजी होईल. निकाल २९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
निणडणूक घोषित केलेल्या क्षेत्रात तत्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली असून ही आचारसंहिता निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)