सामान्य रुग्णालयातील आरोग्यसेवा महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:34 AM2017-12-29T01:34:40+5:302017-12-29T01:34:53+5:30

वाढत्या महागाईने आदीच सामान्य नागरिक बेजार झाले आहेत. त्यातच शासकीय रुग्णालयाने नोंदणी शुल्क दुप्पट तर इतरही तपासणी शुल्कात प्रचंड वाढ केल्ल्याने जनसामान्यांना स्वस्त दरात मिळणार उपचार महागला असल्याने सामान्य नागरिकांत आरोग्य विभागाबाबत रोष व्यक्त होत आहे.

General Hospital Healthcare Expenses | सामान्य रुग्णालयातील आरोग्यसेवा महागली

सामान्य रुग्णालयातील आरोग्यसेवा महागली

googlenewsNext
ठळक मुद्देनोंदणी शुल्क दुप्पट : नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वाढत्या महागाईने आदीच सामान्य नागरिक बेजार झाले आहेत. त्यातच शासकीय रुग्णालयाने नोंदणी शुल्क दुप्पट तर इतरही तपासणी शुल्कात प्रचंड वाढ केल्ल्याने जनसामान्यांना स्वस्त दरात मिळणार उपचार महागला असल्याने सामान्य नागरिकांत आरोग्य विभागाबाबत रोष व्यक्त होत आहे.
खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नसल्याने सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असतात. मात्र मागील सहा वर्षांत नोंदणी शुल्कात व इतर शुल्कात कुठलिही वाढ केली नसल्यामुळे आरोग्य विभागाने २३ डिसेंबरपासून वाढ केली आहे. त्यानुसार पूर्वी रुग्णांना १० रुपये देऊन नोंदणी करावी, लागायची मात्र आता ही नोंदणी दुप्पट म्हणजेच २० रुपये करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात योग्य उपचार होत नाही. अशी नेहमीच ओरड असते. स्वस्त दरात उपचार म्हणून शासकीय रुग्णालयाकडे बघितले जाते. मात्र आता येथील शुल्कातही वाढ झाल्याने खासगी रुग्णालयाचा आधार घ्यायचा का असा प्रश्नही रुग्णांना पडत आहे. नव्या दरानुसार नोंदणी शुल्क, इसीजी, हदयविकार तपासणी, उच्चरक्तदाब तपासणी, एक्स-रे तपासणी आदी शुल्कात वाढ केल्याने जिल्हा रुग्णालयसुद्धा आता महागडे होत असल्याने गरिबांच्या आवाक्याबाहेरच जात आहे.
रुग्णालयात नेहमीच औषधांचा तुटवडा
येथील रुग्णालयात नेहमीच औषधांचा तुटवडा दिसून येत असतो. बहुतेकदा अत्याआवश्क औषधसाठासुद्धा रुग्णालयात उपलब्ध राहत नाही. परिणामी रुग्णाला औषधीची चिट्टी घेऊन खासगी रुग्णालयातून औषधी खरेदी करावी लागते. त्यातच शुल्कात वाढ केल्याने रुग्णांमध्ये आरोग्य विभागाप्रती रोष व्यक्त होत आहे.

शासनाच्या जाहीर केलेल्या नव्या परिपत्रकानुसार शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप नाही. आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करीत आहोत.
- एस. मोरे, अधिष्ठाता,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर

Web Title: General Hospital Healthcare Expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.