जिल्हाधिकाºयांच्या समितीकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:56 PM2017-10-25T23:56:54+5:302017-10-25T23:57:05+5:30
चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जिल्हा सामान्य रुग्णालयातील) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जिल्हा सामान्य रुग्णालयातील) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात गठित केलेल्या चौकशी समितीने बुधवारी रुग्णालयाची आकस्मिक पाहणी करून व्यवस्थेचे निरीक्षण केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या या रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासू नये तसेच सर्व कर्मचाºयांच्या बायोमेट्रिक उपस्थितीसाठी यंत्रणा लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणाºया जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवा ही राज्यातील प्रगत रुग्णसेवा झाली पाहिजे, यासाठी या ठिकाणच्या बालमृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती शोधून काढण्यात यावी, मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी सर्व साधनसुविधांची उपलब्धता करुन देण्यात यावी, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी तसेच महाराष्ट्रातील अद्ययावत नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून चंद्रपूरला नाव लैकिक मिळावा, यासाठी उपाय योजनांसाठी ही समिती काम करणार आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या नेतृत्वात जि.प.चे मुख्य कार्यकारी जितेंद्र पापळकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे प्रकल्प अधिकरी एम.आर.दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.उमेश नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मुनघाटे, डॉ.बेंडले यांच्या चमूने पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकाºयांनी बाह्यरूग्ण विभाग, प्रसूती विभाग, नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग (एसएनसीयू), औषधी पुरवठा विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयाला औषधांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी चालू आर्थिक वर्षाचे व पुढील वर्षाचे नियोजन करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाºयांनी केली. प्रसंगी स्थानिक स्तरावर यासाठी निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांना दिले.
विविध समस्यांवर चर्चा
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा, उपलब्ध औषधांचा पुरवठा, बाल व ज्येष्ठांच्या अतिदक्षता विभागाची स्थिती, या ठिकाणी रात्री व दिवसा काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयांची उपलब्धता सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असणाºया सोईसुविधा, डॉक्टर व रुग्णांसाठी आवश्यक असणाºया सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती, या परिसरातील सुरक्षा व्यवस्था, प्रलंबित बांधकाम अशा आदी विषयावर या समितीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली.