योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:00 AM2018-04-25T01:00:46+5:302018-04-25T01:00:46+5:30

पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या पुढाकाराने जनसामान्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून सामान्य जनतेपर्यंत त्याचा लाभ पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वच्छतेमधेच नव्हे, तर अनेक बाबींमध्ये आज देश प्रगतिपथावर आहे.

Get the benefits of schemes to the general public | योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचवा

योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचवा

Next
ठळक मुद्देनाना श्यामकुळे : वरोऱ्यात लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या पुढाकाराने जनसामान्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून सामान्य जनतेपर्यंत त्याचा लाभ पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वच्छतेमधेच नव्हे, तर अनेक बाबींमध्ये आज देश प्रगतिपथावर आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या अनेक योजना राबविण्यात येत असून भाजप सरकार जनतेच्या हितासाठी प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन आमदार नाना श्यामकुळे यांनी केले.
येथील मीनाक्षी गॅस एजन्सीच्या वतीने टिळक वॉर्ड परिसरामधे ग्रामीण भागातील महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाळू धानोरकर, माजी पालकमंत्री संजय देवतऴे, वरोरा नगर परिषदचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, पं. स. सभापती रोहीणी देवतऴे, वरोरा विधानसभा संपर्क प्रमुख विजय राऊत, माजी नगराध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, ओम मांडवकर, बाबा बागडे आदी उपस्थित होते. तरआमदार बाळू धानोरकर म्हणाले, शासनाने मोठी महागाई वाढवली आहे. काही वर्षापूवी गॅस सिलिंडर स्वस्तात मिळायचे मात्र आता आठशे रुपयांवर पोहचले आहे. योजनेच्या माध्यमातून सामान्य जनतेची दिशाभूल व्हायला नको, गरिबांची फसवणूक व्हायला नको. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत आता नव्याने बदल करण्याची गरज आहे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नव्याने गॅस कनेक्शनचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सचिन नागरे तर आभार वैभव खांडरे यांनी मानले. यावेळी विनोद खांडरे, श्रीतीज खांडरे, नंदू राहटे, माधुरी देशमुख तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टेकरी येथे गॅस कनेक्शनचे वाटप
सिंदेवाही : महाजन इंडेनच्या वतीन टेकरी येथील इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात उज्ज्वला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पार पडले. तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती मधुकर मडावी, नगराध्यक्ष मोहीनी गेडाम, सरपंच यशवंत सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र बोरकर, गोपीचंद गणवीर, उपसरपंच हेमलता खोबरागडे, संजय गजपुरे, होमदेव मेश्राम, गॅस एजन्सी संचालक रमेश महाजन आदी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना महिलांसाठी नवसंजीवनी ठरली आहे, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी खा. अशोक नेते यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी निराशा धनघरे, मेघा कामडी, संगिता बावणे, रेशमा कोटरंगे, चंदा शेरकुरे या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीधर वाढई, संचालन श्रीधर वाढई तर आभार प्रफुल महाजन यांनी केले.

 

Web Title: Get the benefits of schemes to the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.