अद्ययावत हॉस्पिटल जनसेवेत लवकरच रुजू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:34+5:30

पालकमंत्री विजय वडेट्टीवार सध्या चार दिवसांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी राजुरा व गडचांदूर येथील कार्यक्रमानंतर रात्री त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शुक्रवारी त्यांनी सकाळी बायपास रोड परिसरात शंभर एकरावर आकारास येत असलेल्या मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी केली.

Get up to date with the latest hospital public services | अद्ययावत हॉस्पिटल जनसेवेत लवकरच रुजू करा

अद्ययावत हॉस्पिटल जनसेवेत लवकरच रुजू करा

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी करून दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर महानगराच्या बायपास परिसरात उभ्या राहात असलेल्या मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार सध्या चार दिवसांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी राजुरा व गडचांदूर येथील कार्यक्रमानंतर रात्री त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शुक्रवारी त्यांनी सकाळी बायपास रोड परिसरात शंभर एकरावर आकारास येत असलेल्या मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी केली.
सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांनी या दोन्हीही निर्माणाधीन वास्तूला भेट दिली. या वास्तूचे कामकाज नियोजित वेळेनुसार व्हावेत. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे निर्देश त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यासाठी अतिशय भूषणावह असे हे हॉस्पिटल व्हावेत, यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी निर्माणाधीन वास्तूच्या वैशिष्टयाची माहिती घेतली. बायपास रोडवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची इमारत शंभर एकर जागेत उभी राहत आहे. सुमारे सहाशे कोटीहून अधिक निधी यासाठी मंजूर झाला असून ६४० बेडचे रूग्णालयसुद्धा याठिकाणी उभे राहणार आहे. तर याच परिसरात राज्यशासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाग, जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर
आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून खासगी भागीदारी तत्त्वावर शंभर खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येत आहे. हॉस्पिटलच्या निर्माण संदर्भात काम करणाºया विविध एजन्सीच्या अधिकारी व समन्वयकांसोबत चर्चा केली.
या भागातील जनतेला उत्तमात उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी लवकरात लवकर या भव्य वास्तूमधून आरोग्यसुविधा सुरू व्हाव्यात. यासाठी सगळ्यांनी जागरूकपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Get up to date with the latest hospital public services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.