सरकारी योजना घराघरात पोहचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 10:05 PM2018-11-04T22:05:11+5:302018-11-04T22:05:32+5:30
राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच निवडणुकांना समोर जाणे शक्य आहे. तसेच बुथ व शक्तीकेंद्र प्रमुख हे निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आगामी निवडणुकींना सामोरे जात असताना सरकारकडून अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यात येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच निवडणुकांना समोर जाणे शक्य आहे. तसेच बुथ व शक्तीकेंद्र प्रमुख हे निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आगामी निवडणुकींना सामोरे जात असताना सरकारकडून अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यात येतात. त्या योजना समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले.
कोरपना येथील ओम मंगल कार्यालय व जिवती तालुक्यातील टेकाअजुर्नी शिवमंदिराजवळ भाजपा बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व पदाधिकारी यांचा अभ्यास वर्ग पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अॅड. संजय धोटे, भाजपा पुर्व विदर्भ प्रभारी श्रीकांत देशपांडे, लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा महामंत्री राहुल सराफ, विधानसभा विस्तारक सतीश दांडगे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघुजी गेडाम आदी उपस्थित होते.
राज्य व केंद्र सरकार शतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय या सरकारने घेतले असुन गृहीणींना चुलीपासुन मुक्त करण्यासाठी उज्वला योजना, प्रत्येक घरात विज कनेक्शन पोहचावे यासाठी सौभाग्य योजना, गरजुंना स्वस्त दरात औषध उपलब्ध व्हावेत यासाठी अमृत योजना यांसारख्या अनेक योजना यशस्वी सुरू आहेत. या योजना समाजाच्या शेवटपर्यंत पोहचाव्या यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन ना. अहीर यांनी केले.
अभ्यास वगार्ला जिवतीचे तालुका अध्यक्ष केव गिरमाजी, कोरपनाचे तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, जि. प. सभापती गोदावरी केंद्रे, जिवती पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, जि. प. सदस्या कमला राठोड, नगराध्यक्ष पुष्पा नैताम सोयाम, गटनेते अमर राठोड, कोरपना प. स. सदस्य नुतन जिवणे, नगरसेवक सतिश उपलेंचवार, सुरेश केंद्रे, रमेश मालेकर, सचिन डोहे, राजेश राठोड, संजय मुसळे, कवडु जरिले, अरूण मडावी, जया धारणकर, सविता पेटकर, हितेश चव्हाण, विशाल गज्जलवार, गोपिनाथ चव्हाण यांच्यासह बुथ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.