आता घरातूनच काढा लर्निंग लायसन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:52+5:302021-06-11T04:19:52+5:30

चंद्रपूर : वाहन चालविण्यासाठी प्रत्येकाला वाहन चालविण्याचा आरटीओकडून परवाना काढावा लागतो; मात्र अनेकवेळा वेळ नसतो किंवा योग्य माहिती नसल्यामुळे ...

Get a learning license out of the house now | आता घरातूनच काढा लर्निंग लायसन्स

आता घरातूनच काढा लर्निंग लायसन्स

Next

चंद्रपूर : वाहन चालविण्यासाठी प्रत्येकाला वाहन चालविण्याचा आरटीओकडून परवाना काढावा लागतो; मात्र अनेकवेळा वेळ नसतो किंवा योग्य माहिती नसल्यामुळे परवाना काढणे त्रासदायक ठरते. त्यातच काहींची दलालांकडून लूटही केली जाते. या सर्व त्रासापासून आता मुक्तता होणार असून, शिकाऊ वाहन परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा न मारता घरबसल्या ऑनलाइन चाचणी देऊन वाहन चालविण्याचा परवाना घेता येणार आहे. ही सोय पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्याप्रमाणेच राष्ट्रीय सूचना केंद्राने वाहन व सारथी प्रणालीमध्ये बदल केले आहे. या सेवांमध्ये आता घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना चाचणी देणे आणि वाहन वितरकांच्या स्तरावर वाहन क्रमांकही जारी करण्याची सेवा ऑनलाइन केली आहे. त्यामुळे वाहनधारकांना सुविधा होणार असून, आरटीओ कार्यालयातील चकरा मारण्याचा त्रास कमी होणार आहे; मात्र तांत्रिक अडचण किंवा आधार कार्ड नसेल तर या सेवांपासून वंचित रहावे लागणार आहे.

बाॅक्स

असा करा ऑनलाइन अर्ज

घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना चाचणीचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये आधार क्रमांक नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदारांचे नाव, पत्ता, स्वाक्षरी, आधार, डेटा बेसमधून परिवहन या संकेतस्थळावर येणार आहे. यामुळे अर्जदाराची ओळख तसेच त्याचा रहिवासी पत्ता ओरटीओ विभागाला कळणार आहे.

बाॅक्स...तर जावे लागेल आरटीओ कार्यालयात

घरबसल्या वाहन परवाना मिळविण्यासाठी संपूर्ण माहिती अपडेट असणे गरजेचे आहे. यामध्ये वाहन परवाना काढणाऱ्याकडे आधार कार्ड असणे अत्यावश्यक आहे. याशिवाय हा परवाना मिळणार नाही. विशेषत: ज्यांना ऑनलाइन परीक्षा देता येणार नाही. त्यांना आरटीओ कार्यालयात गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. यासोबतच परवाना काढताना काही तांत्रिक अडचणी आल्यास अशावेळी परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना आरटीओ कार्यालयात जावेच लागणार आहे.

बाॅक्स

नवीन वाहनांची प्रवेश नोंदणी वितरकाकडूनच

नवीन वाहन घेतल्यानंतर पाॅसिंग तसेच इतर कामासाठी आरटीओ कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. आरटीओ कार्यालयातील अधिकारी या वाहनाची तपासणी करूनच ते पास करीत होते. आता मात्र नव्या प्रणालीनुसार नवीन वाहन घेतल्यानंतर वाहन वितरकांच्या स्तरावरच वाहन क्रमांक जारी करणार आहे. त्यामुळे वाहनधारकांचा हा त्रासही आता वाचणार आहे.

कोट

उपविभागीय परिवहन अधिकारी, चंद्रपूर.

Web Title: Get a learning license out of the house now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.