कोरोना संकट टाळण्यासाठी मास्क घालूनच घराबाहेर पडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:29 AM2021-07-30T04:29:46+5:302021-07-30T04:29:46+5:30

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे गाफील न राहता संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ...

Get out of the house wearing a mask to avoid corona crisis | कोरोना संकट टाळण्यासाठी मास्क घालूनच घराबाहेर पडा

कोरोना संकट टाळण्यासाठी मास्क घालूनच घराबाहेर पडा

Next

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे गाफील न राहता संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या नागरिकांचा कल मास्क न वापरण्याकडे दिसत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या सूचनेनुसार मास्कची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. बुधवारी महाकाली मंदिर मार्गावर मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना थांबवून नम्रतापूर्वक व सौजन्यतेने मास्क घालूनच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी मंगळवारी दिलेल्या निर्देशानुसार मास्कची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शहरी भागात दुकानांच्या वेळा ठरवून दिल्यानंतरही त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. ४ वाजेनंतर संबंधित आस्थापना बंद झाल्या पाहिजेत. त्यासाठी महानगरपालिकेच्या तिन्ही झोनच्या टीम पुन्हा सक्रिय कराव्यात, अशा सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या.

बुधवारी महाकाली मंदिर मुख्य रस्त्यावर मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनी घराबाहेर निघताना मास्क लावूनच निघावे, अशा नम्रतापूर्वक व सौजन्यतेने सूचना देण्यात आल्या. ही मोहीम वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) अमोल शेळके यांच्यासह झोनचे शिपाई यांच्या उपस्थितीत पार पडली.

Web Title: Get out of the house wearing a mask to avoid corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.