उपचाराच्या चौकटीतून बाहेर निघून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:28 PM2019-02-03T23:28:13+5:302019-02-03T23:28:51+5:30

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनामुळे एक सकारात्मक उर्जा निर्माण झाली असून ही ऊर्जा व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. येथे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांर्ना पुरस्कार मिळाला, त्या सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे.

Get out of the remedies and try to get rid of them | उपचाराच्या चौकटीतून बाहेर निघून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करा

उपचाराच्या चौकटीतून बाहेर निघून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करा

googlenewsNext
ठळक मुद्देअभय बंग : ७ व्या व्यसनमुक्ती संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनामुळे एक सकारात्मक उर्जा निर्माण झाली असून ही ऊर्जा व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. येथे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांर्ना पुरस्कार मिळाला, त्या सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. यापुढेही जबाबदारीने त्यांनी व्यसनमुक्तीसाठी काम करावे. व्यसनमुक्तीसाठी केवळ उपचार या चौकटीत न राहता या चौकटीबाहेर निघून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आणि महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमाची सांगता रविवारी झाली. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, संमेलनाध्यक्ष डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, शारदा बडोले, आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड, कीर्तनकार तुषार सूर्यवंशी, नशाबंदी मंडळाच्या वर्षा विलास, समाज कल्याणचे अतिरिक्त आयुक्त खंडाते, चंद्रपूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले, व्यसनमुक्तीसाठी राज्यसरकारला जी मदत करता येईल, ती यापुढेही आपण करणार असून व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी नेहमीच सरकारसोबत राहू, अशी ग्वाही डॉ. बंग यांनी दिली.
‘‘व्यसनमुक्त प्रसार माध्यमे आणि साहित्यिकांची जबाबदारी’ या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, गजानन निमदेव, देवेंद्र गांवडे, श्रीपाद अपराजित, सिनेअभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, नितीन कुळकर्णी यांनी दारुमुक्ती हाच पर्याय पुढे असल्याचा सुर व्यक्त केला. दारुबंदी हा उपाय ठरू शकत नाही. दारुमुक्तीलाच प्राधान्य देणे योग्य ठरेल असा सूर त्यांनी व्यक्त केला.
व्यसनमुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा-बडोले
सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी व्यसनमुक्त महाराष्ट्र निर्माण करणे काळाची गरज असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. व्यसनमुक्त महाराष्टÑ घडविण्यासाठी आपणा सर्वांनी पुढे येऊन एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
१३ ठराव मंजूर
याप्रसंगी निवडणुका दारूमुक्त करणे, दारूबंदीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, गावपातळीवर सामूहिक व्यसनमुक्त गट निर्माण करणे, मतदान केंद्रांवर ब्रिथलायझर मशीन उपलब्ध करून देणे आदी महत्त्वाचे १३ ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आले.

Web Title: Get out of the remedies and try to get rid of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.