म्युकरमायकोसिसबाबत त्वरित निदान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:00+5:302021-06-04T04:22:00+5:30

चंद्रपूर : कोविड पश्चात होणारा म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण सर्वत्र आढळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही आतापर्यंत ८१ नागरिकांमध्ये या आजाराची ...

Get a quick diagnosis of mucomycosis | म्युकरमायकोसिसबाबत त्वरित निदान करा

म्युकरमायकोसिसबाबत त्वरित निदान करा

Next

चंद्रपूर : कोविड पश्चात होणारा म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण सर्वत्र आढळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही आतापर्यंत ८१ नागरिकांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आली असून यापैकी २६ जण बरे झाले आहेत. कोविडमधून बरे झालेले किंवा मधुमेह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात राहून आरोग्य यंत्रणेने या आजाराचे त्वरित निदान करावे, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.

ऊर्जानगर येथील हिराई विश्रामगृहात कोविड संदर्भात आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त अशोक गराटे, तहसीलदार सचिन खंडाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे आदी उपस्थित होते.

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक असलेले ‘ॲम्पोटेरेसीन बी’ या इंजेक्शनची उपलब्धता लवकरच सुरळीत होईल, असे सांगून राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, कोविड रुग्णांवर उपचार करतानाच म्युकरमायकोसीसच्या लक्षणांकडेही लक्ष द्या. तसेच अनियंत्रित मधुमेह असणाऱ्या रुग्णांची माहिती घ्या. यावेळी राज्यमंत्र्यांनी मनपाच्या नवीन रुग्णालयाची परिस्थिती, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्ण, महानगर पालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या, सीसीसी, डीसीएच, डीसीएचसी, आयसीयु व रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता आदींचा आढावा घेतला.

Web Title: Get a quick diagnosis of mucomycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.