गैरसमज दूर करून लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:31+5:302021-06-16T04:37:31+5:30
बाजारात पुन्हा गर्दी वाढली चंद्रपूर : कोरोनामुळे लाॅकडाऊन होता. परिणामी बाजारातील गर्दीवर नियंत्रण होते. आता शिथिलता मिळताच बाजारात मोठ्या ...
बाजारात पुन्हा गर्दी वाढली
चंद्रपूर : कोरोनामुळे लाॅकडाऊन होता. परिणामी बाजारातील गर्दीवर नियंत्रण होते. आता शिथिलता मिळताच बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे यावर आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
सोशल डिस्टन्स केवळ नावालाच
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे. मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता खरेदी केली जात आहे. त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी
चंद्रपूर : पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक घरांवर ताडपत्री तसेच प्लॅस्टिक टाकण्याच्या कामाला लागले आहे.
त्यामुळे सध्या या दुकानांमध्ये गर्दी होत असून काही व्यावसायिक अव्वाच्या सव्वा दर लावत आहे.
शहरातील एटीएममध्ये ठणटणाट
चंद्रपूर : शहरातील बऱ्याच बँकांचे एटीएम बंद असल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे. नागरिकांना आर्थिक गरजा भागविण्यासाठी पैशांची गरज आहे. परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये अनेकवेळा पैसेच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने एटीएममध्ये पैशांची व्यवस्था करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : मागील दोन दिवसांपासून येणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उन्हाळ्याच्या दिवसात महापालिकेने नाल्यांची स्वच्छता केली. मात्र ती केवळ कागदावर असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
रस्त्यावर वाहनांच्या रांगा
चंद्रपूर : शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर चंद्रपुरातील बाजारपेठ फुलली आहे. दरम्यान, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत आहे.त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
लहान व्यावसायिक ग्राहकांच्या सेवेत
चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये ग्राहक लहान व्यावसायिकांकडून जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहे. विशेष म्हणजे, अन्य वेळी मोठमोठ्या दुकानातून खरेदी करणारे ग्राहकही आता छोट्या व्यावसायिकांना महत्त्व देत आहे.
गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता
चंद्रपूर: शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. वर्दळीच्या अनेक मार्गावर गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बनवावे, अशी मागणी होत आहे.
बसस्थानक परिसरात पसरले चिखल
चंद्रपूर : येथील बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येथे अनेक साहित्य टाकण्यात आले असून बस लावण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. सध्या परिसरातील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने येथे चिखल पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
रिक्त पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. शेती हंगामाचे दिवस सुरू आहेत. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येत आहेत. परंतु, महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम झाला आहे.
शहरातील रस्त्यांवर बांधकाम साहित्य
चंद्रपूर : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. यामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सध्या पावसाचे दिवस आहे. त्यामुळे दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. मनपाने सर्व वॉर्डांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.