मदत मिळाल्यानेे गरजू महिलेचा उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:56+5:302021-03-09T04:30:56+5:30
साई प्रतिष्ठानचा उपक्रम : कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा मार्ग मोकळा चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल ...
साई प्रतिष्ठानचा उपक्रम : कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा मार्ग मोकळा
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल होत होता. यामध्ये एका महिलेला आर्थिक मदत करण्याची विनंती केली जात होती. यासंदर्भात येथील श्री साई प्रतिष्ठनला माहिती मिळताच सदस्यांना संबंधित महिलेची विचारपूस करून तिची परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान, तिच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महिलादिनाचे औचित्य साधून शिलाई मशीन भेट देण्यात आली. विशेष म्हणजे, लागणारे इतर साहित्यही प्रतिष्ठानतर्फे पुरविण्यात येणार आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गाटकीने, उपाध्यक्ष ज्योती शनवारे, सहसचिव विनोद गोवारदीपे, कोषाध्यक्ष प्रमोद वरभे, सदस्य प्रतीक लाड, भूषण कल्लुरवार, श्वेता कंदिकुरवार, माधुरी संगिडवार, नेहा शंकर, भागवत खटी, भास्कर डांगे, घनपाल शनवारे आदींची उपस्थिती होती.