घरकुलांची देयके थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:36+5:30

मूल पंचायत समिती अंतर्गत ४९ ग्रामपंचायतींमधील १११ गावातील नागरिकांना घरकूल मंजूर झाले आहेत. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतंर्गत सन २०१९- २० या वर्षात १३७ घरांचे उद्दिष्ट होते. फक्त १० घरांचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित कामे रेतीअभावी रखडली. रमाई योजनेत ७८१ घरकूल मंजूर असून केवळ ८५ पूर्ण झाले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शबरी घरकूल योजनेत १८१ घरकूल मंजूर झाले. परंतु, यातील केवळ २० कामांना सुरूवात झाली आहे.

Gharkul payments delay | घरकुलांची देयके थंडबस्त्यात

घरकुलांची देयके थंडबस्त्यात

googlenewsNext
ठळक मुद्देलाभार्थी चिंताग्रस्त : रेतीचा पुरवठा ठप्प, केवळ दहा घरांचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : निधी व रेतीच्या अभावामुळे पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, रमाई व शबरी योजनेच्या घरकुलांची देयके रखडल्याने लाभार्थी चिंता व्यक्त करीत आहेत.
मूल पंचायत समिती अंतर्गत ४९ ग्रामपंचायतींमधील १११ गावातील नागरिकांना घरकूल मंजूर झाले आहेत. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतंर्गत सन २०१९- २० या वर्षात १३७ घरांचे उद्दिष्ट होते. फक्त १० घरांचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित कामे रेतीअभावी रखडली. रमाई योजनेत ७८१ घरकूल मंजूर असून केवळ ८५ पूर्ण झाले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शबरी घरकूल योजनेत १८१ घरकूल मंजूर झाले. परंतु, यातील केवळ २० कामांना सुरूवात झाली आहे. यावर्षी घरकूल योजनेसाठी अल्पसा निधी मिळाला. रेती घाटांचे लिलाव न झाल्याने शेकडो नागरिक बांधकामाच्या प्रतिक्षेत आहेत. घरकुलाची देयके पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यात आले. मात्र, निधीअभावी देयक अडकली आहेत.
घरकुलांसाठी अनेकांनी हातउसने पैसे घेतले. तर अनेक दुकानदारांकडून लोहा, सिमेंट व इतर साहित्यांची खरेदी उधारीवर केली. त्या दुकानदाराकडून उधारी मागण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. मात्र लाभार्थ्यांना देयके मिळत नसल्याने पैसे देण्यास अडचण जात आहे. त्यामुळे घरकूल योजनेतील थकित देयके त्वरीत देण्यात यावी, अशी मागणी मूल पं. स. मधील लाभार्थ्यांकडून होत आहे.

घरकुलांची देयके पंचायत समितीच्या लेखा विभागात सादर झाल्याची माहिती आहे. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने शेकडो लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले. त्यामुळे शासनाने तात्काळ निधी दिला पाहिजे.
- संदीप कारमवार, उपसभापती
कृषी उत्पन्न बाजार समिती मूल

घरकूल बांधकामासाठी रेतीचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. निधी मिळाल्यानंतर बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची देयके अदा होणार आहेत.
- मनोज देशमुख, ग्रामीण
गृह निर्माण अभियंता पं.स.मूल

अनेक कुटुंब उघड्यावर
घरकूल मंजूर झाल्यानंतर अनेक कुटुंबांनी स्वत:चे राहते घर पाडून टिनाचे पत्रे, बांबूच्या चपाट्या यापासून घर बांधून वास्तव्य करीत आहेत. मात्र घरकुलाचे देयके अडकले तसेच रेतीचा पुरवठा होत नसल्याने बांधकाम रखडले आहे. सद्या कोरोनाची दहशत पसरली आहे. या दहशतीतही अनेक कुटुंब उघड्यावर जीवन जगत आहे.

Web Title: Gharkul payments delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.