सरकारचा राज्य घटना बदलविण्याचा घाट

By admin | Published: June 2, 2016 02:37 AM2016-06-02T02:37:43+5:302016-06-02T02:37:43+5:30

भारतीय राज्य घटनेने समतावाद, बंधुत्व आणि उपेक्षितांना, वंचितांना त्यांचे मुलभूत हक्क दिले आहेत.

Ghat to change state government event | सरकारचा राज्य घटना बदलविण्याचा घाट

सरकारचा राज्य घटना बदलविण्याचा घाट

Next

प्रकाश आंबेडकर : विरोधाला सज्ज व्हा
बल्लारपूर : भारतीय राज्य घटनेने समतावाद, बंधुत्व आणि उपेक्षितांना, वंचितांना त्यांचे मुलभूत हक्क दिले आहेत. या राज्य घटनेमुळेच दलित, आदिवासी व बहुजन समाजाचे जीवनमान उंचावत आहे. अशी ही राज्यघटना बदलली पाहिजे, या प्रयत्नात प्रतिगामी विचाराची भाजपा सरकार प्रयत्नात आहे व त्याच दिशेने या सरकारची पावले पडत आहेत, असा आरोप करीत बहुजन समाजाने याकरिता सावध राहावे आणि राज्यघटना बदलू नये, याकरिता सर्वांनी विरोध करावा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे आंबेडकरी व बहुजन जनतेला केले.
डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी भाबमचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष कुशल मेश्राम हे होते.
अ‍ॅड. आंबेडकर हे भाजपा सरकारवर शरसंघान करीत पुढे म्हणाले, या सरकारने केवळ मोहक घोषणा दिल्या. पण, प्रत्यक्षात जनतेच्या पदरात काही पडले नाही. शेतकऱ्यांची स्थिती भयंकर वाईट आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव नाही. बेरोजगारी सारखी वाढत चाचली आहे. देशात असहिष्णुतेचे वातावरण पसरले आहे. तरीही, आमच्या काळात संपन्नता नांदत असल्याने ते धादांत खोटे बोलत होते. हे सरकार बदलण्याची संधी २०१९ ला मिळणार आहे. देव देव म्हणणारे सरकार ठेवायचे की समता, बंधुत्व आणि विकासाला प्राधान्य देणारे सरकार आणायचे, ते आपणाला ठरवायचे आहे? ही मानसिकता आतापासूनच बनवा. भाजपा व काँग्रेस दोघांचीही मानसिकता सारखीच, लहान पक्षांना गिळकृंत करुन, आपले वर्चस्व कायम ठेवायचे अशी आहे. सत्ता प्राप्तीकरिता लहान पक्षांचे काही नेते त्यांना बळी पडत आहेत, असा टोला त्यांनी पदप्राप्तीकरिता लाचारी पत्करणाऱ्या नेत्यांना लगावला. खरा आंबेडकर वाद कुणालाच समजला नाही, असे म्हणत, बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालणे, भाषणातून त्यांचे विचार पेरणे आणि स्वत:ला आंबेडकरी अनुयायी म्हणून घेऊन घोषणा देणे. म्हणजे आंबेडकरवाद नव्हे तर त्यांचे विचार कृतीत उतरविले पाहिजेत. तरच, तुम्ही बाबासाहेबांचे खरे अनुयायी ठरणार. तरुणांमध्ये कमालीची उर्मी असते. त्यांच्यात परिवर्तनाचा जोश असतो. आता, आंबेडकरी नेत्यांनी त्यांचे खांद्यावर धुरा यावी. आपण बाजूला व्हावे, असे वयस्क नेत्यांना सूचविले. शेवटी ते म्हणाले, आंबेडकरी चळवळ चालली व बोलली पाहिजे. लोकांच्या कल्याणाकरिता, अन्याय निर्मूलनाकरिता ती चालवावी. ही चळवळ माझी ही मानसिकता आंबेडकरी अनुयायींनी ठेवावी. हेच बाबासाहेबांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करु या! रोहिदास राऊत, उमेश कडू, कविता गौरकार यांचीही भाषण झालीत. संचालन धीरज बांबोळे, प्रास्ताविक दिनेश दुपारे तर आभार प्रदर्शन प्रशांत झामरे यांनी केले. समता सैनिक दलाने त्यांना मानवंदना दिली. (तालुका प्रतिनिधी)

आंबेडकरी विचारधारांच्या संघटनामध्ये पडलेली शकले, याबाबत बोलत रिपब्लिकन पक्षाचे १८ व बामसेफचे एकूण ४२ तुकडे असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. नगर पालिका महानगरपालिकांच्या निवडणुकीत वॉर्डाऐवजी प्रभागवार निवडणूक घेणे म्हणजे लहान पक्षांना संपविणे होय. भाजपा व काँग्रेस हेच करीत येत आहे, असा आंबेडकर यांचा आरोप.

Web Title: Ghat to change state government event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.