घोडाझरी मुख्य कालवा फुटल्याने धान पीक संकटात

By admin | Published: October 27, 2016 12:51 AM2016-10-27T00:51:46+5:302016-10-27T00:51:46+5:30

घोडाझरी नहराच्या येनोली गावाजवळील असलेल्या मुख्य कालव्याच्या नांदगाव वितरिकेकडे जाणाऱ्या ....

Ghodajari main canal fissile in the rice crop crisis | घोडाझरी मुख्य कालवा फुटल्याने धान पीक संकटात

घोडाझरी मुख्य कालवा फुटल्याने धान पीक संकटात

Next

शेतकरी हतबल : कालव्याची दुरूस्ती करण्याची मागणी
तळोधी (बा) : घोडाझरी नहराच्या येनोली गावाजवळील असलेल्या मुख्य कालव्याच्या नांदगाव वितरिकेकडे जाणाऱ्या नहराला मोठे छिद्र पडल्याने नहराच्या मुख्य कालवा फुटला आहे. यामुळे हजारो हेक्टरातील गर्भाशयात असलेले धान पिके संकटात सापडले आहेत. त्वरित नहर दुरुस्त करण्याची मागणी माजी आमदार अविनाश वारजूकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन केली आहे.
घोडाझरी मुख्य कालव्याच्या मागील दोन वर्षापूर्वी नांदगाव वितरिकेवर करोडो रुपये खर्च करून लायनिंगची कामे करण्यात आली. मात्र सिंचाई विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे निकृष्ठ दर्जाची कामे झाली आहेत. याकडे अधिकारीवर्गानीही कानाडोळा केला आहे. मागील वर्षीसुद्धा सोनापूर गावाजवळ मुख्य कालवा फुटला होता. त्यामुळे शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सिंचाई विभागाचे अधिकारीवर्गानी यावर्षीसुद्धा नहराचे योग्य पद्धतीने दुरुस्ती न केल्यामुळे जागोजागी कचरा वाढत गेला. त्यामुळे पाण्याचा दाब वाढत जात असल्यामुळे घोडाझरी नहराचा कालवा फुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी मुख्य कालव्यांच्या दुरूस्तीकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे कामे झालेले आहेत. तसेच सिमेंट काँक्रीट लायनिंगवर भेगा पडलेल्या असून त्या ठिकाणाहूनसुद्धा नहर फुटण्याची शक्यता असताना अधिकारीवर्ग शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी घोडाझरी नहर सुटल्यानंतर फुटला जात असल्यामुळे या नहराची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकर वर्गानी केलेली आहे. तसेच या ठिकाणी करोडो रुपयांचे लायनिंग व मोळीचे कामेसुद्धा निकृष्ठ झालेले असून त्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गानी केलेली आहे.
शेतकरीवर्ग धान पिके संकटात सापडला असून त्वरित फुटलेला नहर दुरूस्ती करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार अविनाश वारजुकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रफुल खापर्डे, माजी सभापती खोजराम मरस्कोल्हे, माजी सरपंच अशोक ताटकर, ग्रामपंचायत सदस्य विलास लांजेवार, डॉ. गिरडकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन केलेली आहे. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले आहे. (वार्ताहर)

Web Title: Ghodajari main canal fissile in the rice crop crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.