घोडाझरी नहराची पाईपलाईन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 05:00 AM2021-11-21T05:00:00+5:302021-11-21T05:00:43+5:30

अप्पर तालुक्यातील सर्वात मोठी तळोधी बा. ग्रामपंचायत आहे. याठिकाणी गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दोन पाण्याच्या टाक्या होत्या. मात्र, गावात नळयोजनेच्या माध्यमातून पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे मागील वर्षी  सिंचाई विभागाच्यावतीने तळोधी बा. येथे नव्याने पूरक पाणीपुरवठा जलविद्युत शुद्धीकरण यंत्र बसविले. त्याकरिता घोडाझरी धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, निकृष्ट पाईपलाईनमुळे जागोजागी पाईपलाईन फुटली जात आहे.

The Ghodazari canal pipeline burst | घोडाझरी नहराची पाईपलाईन फुटली

घोडाझरी नहराची पाईपलाईन फुटली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी बा : वर्षभरापूर्वी पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करून तळोधी बा. येथे जलविद्युत शुद्धीकरण यंत्राची पूरक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, निकृष्ट पाईपलाईनमुळे किटाळीजवळ पाईपलाईन फुटली. यामुळे नळयोजनेचे पाणी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे महिला वर्गाला मोठा त्रास होत आहे.
अप्पर तालुक्यातील सर्वात मोठी तळोधी बा. ग्रामपंचायत आहे. याठिकाणी गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दोन पाण्याच्या टाक्या होत्या. मात्र, गावात नळयोजनेच्या माध्यमातून पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे मागील वर्षी  सिंचाई विभागाच्यावतीने तळोधी बा. येथे नव्याने पूरक पाणीपुरवठा जलविद्युत शुद्धीकरण यंत्र बसविले. त्याकरिता घोडाझरी धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, निकृष्ट पाईपलाईनमुळे जागोजागी पाईपलाईन फुटली जात आहे. त्यामुळे तळोधी बा. येथील नागरिकांना विहीर, बोअरवेलचे पाणी प्यावे लागते आहे. वारंवार नळयोजना बंद केल्या जात असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. ग्रामपंचायत तळोधी बा.च्यावतीने लाईनची दुरुस्ती केली जात असून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली .

निकृष्ट पाईपलाईनमुळे वारंवार पाईपलाईन फुटली जाते. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून  फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येऊन नळयोजना सुरू करावी. 
   -अशोक ताटकर, 
माजी सभापती पं. स. नागभीड

 

Web Title: The Ghodazari canal pipeline burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.