घोडाझरी ते गडबोरी नहराच्या दुरुस्तीची गरज

By admin | Published: March 19, 2016 12:45 AM2016-03-19T00:45:47+5:302016-03-19T00:45:47+5:30

घोडाझरी सिंचाई विभागाचे पाणी नवरगाव परिसराला मिळत असले, तरी अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे,...

Ghodazari needs repair of Gadbhori Nahar | घोडाझरी ते गडबोरी नहराच्या दुरुस्तीची गरज

घोडाझरी ते गडबोरी नहराच्या दुरुस्तीची गरज

Next

नवरगाव : घोडाझरी सिंचाई विभागाचे पाणी नवरगाव परिसराला मिळत असले, तरी अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे, कधी नियोजनाच्या अभावामुळे, कधी कालवा फुटल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक धोक्यात येते. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी घोडाझरी ते गडबोरी नहराच्या दुरुस्तीची गरज असून काही नागरिकांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
घोडाझरी तलाव इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आला. त्यातील पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कालवे (कॅनल) तयार करण्यात आले. तेव्हा घोडाझरी तलावावर अवलंबून असणारे शेतकरीही कमी असल्याने सर्वांना पाणी मुबलक मिळत होते आणि धान पिकही हमखास येत होते. या तलावावर दिवसेंदिवस अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. शेतीची आराजी वाढली. आता जवळजवळ सात हजार हेक्टर शेतजमीन अवलंबून आहे. तलाव तेवढाच आहे. कालवेही तेच आहेत. मात्र जे-जे कालवे तयार केले होते, ते जीर्ण झाले असून विविध ठिकाणी फुटलेले आहेत. बऱ्याच ठिकाणाची माती वाहून गेली आहे. काही ठिकाणची माती नहरात (कालव्यात) पडलेली असल्याने ते बुडालेले आहे. बऱ्याच वर्षापासून नहराचे काम हातात घेण्यात आले नाही. काही भागात नहराचे काँक्रीटीकरण केले. मात्र दोन-अडीच इंचचा थर असल्याने त्यालाही भेगा जावून मोठमोठे खड्डे पडले. एकूण कामच निकृष्ट दर्जाचे करण्यात आले.
बऱ्याच ठिकाणी नहराची उंची कमी असल्याने जास्त पाणी सोडायचे म्हटले तर वरुन पाणी वाहून नहर फुटण्याची भीेती असते. म्हणूृन संबंधित विभाग आहे, त्या परिस्थितीत पाण्याचे वितरण करीत असल्याने शेवटपर्यंत पाणीच पोहचत नाही. आणि पर्यायाने घोडाझरी नहराच्या पाण्यावर अवलंबून असलेली धान शेती पाण्याअभावी नष्ट होत आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.
ही सर्व समस्या लक्षात घेवून नवरगाव येथील शेतकरी बांधवांनी सदर नहराच्या दुरस्तीच्या कामाच्या संदर्भात सिंचाई शाखा सिंदेवाहीचे सहायक अभियंता डी.जी. रिजवी यांची भेट घेऊन, त्यांना शिष्टमंडळाच्या वतीने १७ मार्चला विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये नवरगाव येथील माजी सरपंच दीपक चहान्दे, दादाजी चनघनवार, बासीद शेख, संजय बोडणे, नामदेव बोरकर, मनोहर सहारे, संजय गभने, जानकीराम कामडी, भोला इदूलवार, उपासराव बोरकर यांचा समावेश होता.
अधिकारी व शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली असून घोडाझरी तलावापासून ते गडबोरी-वानेरीपर्यंत नहराच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बनवून शासनाकडे पाठविले आहे. ते मंजूर होण्यासाठी एक-दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो. परंतु २०१६ मध्ये दीड ते दोन कोटी रुपयांची कामे हाती घेतली असून काही भागातून दुरुस्तीची कामे होणार आहेत.
मात्र अधिकचा निधी नसल्याने शासनाने त्या-त्या भागातील ग्रामपंचायतीला पत्र दिल्यास रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत काम केल्यास नागरिकांना काम मिळेल

Web Title: Ghodazari needs repair of Gadbhori Nahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.