घुग्घुस वीज वितरण कार्यालयाला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:52 AM2021-02-06T04:52:26+5:302021-02-06T04:52:26+5:30
घुग्घुस : कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, यासाठी भाजपाने घुग्घुसच्या गांधी चौकातून महाआघाडी सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून ...
घुग्घुस : कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, यासाठी भाजपाने घुग्घुसच्या गांधी चौकातून महाआघाडी सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून दहन केले. येथील वीज वितरण कार्यालयाला कुलूप ठोकले.
सहायक अभियंता अमोल धुमणे व ठाणेदार राहुल बांबोर्डे यांना निवेदन दिले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात महाआघाडी सरकारची गावाच्या प्रमुख मार्गाने प्रेतयात्रा काढून छत्रपती शिवाजी चौकात दहन करण्यात आले. त्यानंतर मोर्चेकरी वीज वितरण कार्यालयाकडे वळले. वीज कार्यालयाला कुलूप ठोकले.
कोरोना काळात वीज मंडळाने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा देयके पाठविले. कोरोना काळातील देयके माफ करावीत, यासाठी भाजपने वीजदेयके जाळून अनेकदा आंदोलन केले होते. मात्र नुकताच वीज मंडळाने देयके भरा अन्यथा वीज कनेक्शन कापण्याचा गंभीर इशारा दिल्याने वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरला होता. त्यामुळे भाजपाने हे आंदोलन केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले, भाजपा युवामोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपा जिल्हा महामंत्री अनिल डोंगरे, पं.स.माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, साजन गोहणे, प्रकाश बोबडे आदी उपस्थित होते.