मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:35 AM2021-09-16T04:35:10+5:302021-09-16T04:35:10+5:30
बसमध्ये तिकीट ट्रेचा वापर चंद्रपूर : महामंडळाने तंत्रज्ञानाच्या युगात पाऊल टाकीत तिकिटे फाडण्यासाठी नवी मशीन आणली होती. त्या मशीनद्वारे ...
बसमध्ये तिकीट ट्रेचा वापर
चंद्रपूर : महामंडळाने तंत्रज्ञानाच्या युगात पाऊल टाकीत तिकिटे फाडण्यासाठी नवी मशीन आणली होती. त्या मशीनद्वारे वाहक तिकीट फाडत होते. मात्र, काही वर्षांतच या मशीनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा जुन्या तिकीट ट्रेचा वापर सुरू आहे. मशीन चार्जिंग करण्यासाठी चार्जर नसल्याने काही मशीन बंद आहेत.
बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन
चंद्रपूर : मागील सहा वर्षांपासून बंद असलेली दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्वच बाजारपेठा सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू आहेत. मात्र, बारमध्ये मोठी गर्दी उसळत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
युवकांना राजकीय धडे देण्याची गरज
चंद्रपूर : सर्वच क्षेत्रांत युवक जात असले तरी राजकारणात युवकांचा शिरकाव कमी दिसून येत आहे. अनेकांमध्ये राजकारणाबाबत अनास्था आहे. त्यामुळे राजकीय पद्धतीबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी युवकांना राजकीय विश्लेषकांद्वारे मार्गदर्शन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
वजन काट्यांची तपासणी करावी
चंद्रपूर : विक्रेत्यांच्या वजनकाट्यांची दरवर्षी तपासणी करावी, असे निर्देश आहेत. मात्र, अनेक व्यापाऱ्यांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. भाजी बाजारामध्ये तर अनेक विक्रेते वजनाऐवजी दगडाचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस भरती प्रशिक्षण राबवावे
चंद्रपूर : गृह विभागाने पोलीस भरती घेण्याची घोषणा केली आहे, तसेच सैन्यभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक या भरतीत सहभागी व्हावेत, या उद्देशाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबविण्यात यावे, अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांकडून होत आहे.
मोफत संगणक प्रशिक्षण द्यावे
चंद्रपूर : सगळीकडे संगणकीय कामाला सुरुवात झाली आहे. संगणक साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी शासनातर्फे मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र, आता हे प्रशिक्षण बंद करण्यात आले आहे. याउलट खासगी संगणकचालक वारेमाप पैसे घेतात. त्यामुळे गरजू व गरीब विद्यार्थी ते शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यामुळे शासनाने मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी होत आहे.
महिला शौचालयाची निर्मिती करावी
चंद्रपूर : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, शहरातील एकाही चौकात महिला शौचालय नाही. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबना होते. अनेकदा महिला शौचालयाची मनपाकडे मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
चंद्रपूर शहरात वाहतुकीचा खोळंबा
चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे.