मुलींनी उत्तुंग भरारी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:45 PM2018-10-19T22:45:29+5:302018-10-19T22:45:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा दिली आहे. मात्र ही केवळ घोषणा नसून आपल्या सर्वांची प्राथमिकता व जबाबदारी आहे. मुलींच्या सुरक्षेसोबतच सर्वच क्षेत्रात मुलींची प्रगती व्हावी, यासाठी आपण सतत प्रयत्नरत आहोत. त्यामुळे मुलींनी यशाला गवसणी घालत उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहीर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा दिली आहे. मात्र ही केवळ घोषणा नसून आपल्या सर्वांची प्राथमिकता व जबाबदारी आहे. मुलींच्या सुरक्षेसोबतच सर्वच क्षेत्रात मुलींची प्रगती व्हावी, यासाठी आपण सतत प्रयत्नरत आहोत. त्यामुळे मुलींनी यशाला गवसणी घालत उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहीर यांनी केले.
बतुकम्मा महोत्सव कमिटीच्या वतीने तेलगू भाषिक बांधवांचा बतुकम्मा महोत्सव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी तेलुगू हायस्कूल लालपेठ कॉलरी येथे नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना श्यामकुळे, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, उपमहापौर अनील फुलझेले, श्रीधर रेड्डी, दिनकर पावडे, मोहन चौैधरी, नगरसेविका कल्पना बागुलकर, ज्योती गेडाम, माया उईके, शिला चव्हाण, निलम आक्केवार, नगरसेवक संदीप आवारी, उपक्षेत्रीय प्रबंधक हलदर उपस्थित होते.
ना. हसंराज अहीर पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने तेलंगणा प्रदेशाची प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्यानंतर तेथील संस्कृती जवळून पाहण्याचा योग आला. व त्यातूनच या बतुकम्मा महोत्सवाचे आयोजन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
चंद्रपूर क्षेत्रात लाखोंच्या संख्येने तेलुगू भाषिक वास्तव्यास असून हा सण दरवर्षी साजरा करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना तेलंगणाचे आमदार किशन रेड्डी यांनी पुढील वर्षी महोत्सवासाठी तेलंगणातून महिलांचा बतुकम्मा समूह व चित्रपट सुष्टीतील सिनेतारिका आणण्याचे आश्वासन दिले. यावेळी पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला गणेश गेडाम, जितेंद्र धोटे, सतीश तिवारी, दिनकर पावडे, बतुकम्मा कमिटीचे अध्यक्ष तथा मनपा झोन सभापती श्याम कनकम, सदस्य संजय मिसलवार, राजेश तिवारी, श्रीनिवास रंगेरी, राजू कामपेल्ली आदी उपस्थित होते.