विदर्भातील रुग्णांना वाजवी दरात उत्तम उपचार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:12+5:302021-04-29T04:21:12+5:30

चंद्रपूर : विदर्भासह चंद्रपुरातील कोरोना रुग्ण उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने लगतच्या तेलंगणा राज्यात जात आहे. अशात येथील खासगी रुग्णालयांकडून ...

Give the best treatment to the patients of Vidarbha at reasonable rates | विदर्भातील रुग्णांना वाजवी दरात उत्तम उपचार द्या

विदर्भातील रुग्णांना वाजवी दरात उत्तम उपचार द्या

Next

चंद्रपूर : विदर्भासह चंद्रपुरातील कोरोना रुग्ण उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने लगतच्या तेलंगणा राज्यात जात आहे. अशात येथील खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट केल्याच्या तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांना प्राप्त होताच आ. जोरगेवार यांनी तेलंगणाचे आरोग्यमंत्री इटेला राजेंडर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तेथील खासगी रुग्णालयात कोरोना उपचारासंबधीचे दर निर्धारित करून विदर्भातील रुग्णांना वाजवी दरात उत्तम उपचार देण्याची विनंती केली आहे.

तसेच तेथील शासकीय रुग्णालयात बेड, व्हेेेंटिलेटर, ऑक्सिजन आणि औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात यावा, अशी विनंतीही आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली आहे. किशोर जोरगेवार यांच्या विनंतीनंतर ना. इटेला राजेंडर यांनीही याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वस्त केेले आहे.

विदर्भासह चंद्रपुरातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती अनियंत्रित होताना दिसून येत आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना केल्या जात आहे. तसेच आमदार जोरगेवार स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून असून येथील बेडसंख्या वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे.

असे असले तरी बेडअभावी अनेक रुग्ण उपचाराकरिता तेलंगणा राज्यातील करीम नगर, आसिफाबाद, मंचेरियाल येथे दाखल होत आहे. मात्र येथील काही रुग्णालयांकडून अवाढव्य दर आकारत रुग्णांची आर्थिक लूट केल्या जात आहे. त्यामुळे आज आमदार किशोर जोरगेवार यांनी तेलंगणा राज्याचे आरोग्यमंत्री इटेला राजेंडर यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा करत त्यांना परिस्थितीबाबत अवगत केले आहे.

Web Title: Give the best treatment to the patients of Vidarbha at reasonable rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.