छत्रपती शाहु महाराजांना भारतरत्न पुरस्कार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:31 AM2021-08-12T04:31:55+5:302021-08-12T04:31:55+5:30
चंद्रपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शक व भारतातील तमाम बहुजनांचे कैवारी, स्त्रियांचे उद्धारक, आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती ...
चंद्रपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शक व भारतातील तमाम बहुजनांचे कैवारी, स्त्रियांचे उद्धारक, आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना भारतत्न पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात यावा, अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख प्रवीण हेमचंद्र खोबरागडे यांच्या मार्गदर्शनात निवेदनातून करण्यात आली.
संपूर्ण भारतातील लोकांचे कैवारी, देशातील सामाजिक व आर्थिक समानता प्रस्थापित व्हावी, म्हणून तळमळीने शासननिर्णय करणारे व्यक्तिमत्त्व व ज्यांनी दुर्बल शोषित घटकांना आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षण व इतर क्षेत्रात सक्षम करण्याचे कार्य केले. अशा लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी अशोक निमगडे, विशाल अलोणे, अशोक टेंभरे, प्रतीक डोर्लीकर, राजस खोबरागडे, प्रेमदास बोरकर, मृणाल कांबळे, अश्विनी खोबरागडे, गीता रामटेके, ज्योती शिवनकर, माणिक जुमडे, हरिदास देवगडे, महादेव कांबळे, वामनराव चन्द्रीकापुरे, शंकर वेल्हेकर, नागसेन वानखेडे, बंडू दूधे, दीपक गणवीर, एच. एम. भोवते. आदी उपस्थित होते.