धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची रक्कम द्या; सावली तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:10+5:302021-06-10T04:20:10+5:30
सावली तालुक्याची धान उत्पादक तालुका म्हणून ओळख आहे. या शेतकऱ्यांना शासनाने सातशे रुपये बोनस जाहीर केला. अनेक शेतकऱ्यांनी ...
सावली तालुक्याची धान उत्पादक तालुका म्हणून ओळख आहे. या शेतकऱ्यांना शासनाने सातशे रुपये बोनस जाहीर केला. अनेक शेतकऱ्यांनी आपले धान सोसायटी व फेडरेशनला दिले होते. शासनाने ठरवून दिलेली १,८६८ रुपये शेतकऱ्यांना मिळाले. मात्र, मंजूर असलेली सातशे रुपये बोनसची राशी जमा होण्यास विलंब होत आहे. आता शेतीचा हंगाम सुरू होत आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्याकडे बी-बियाणे घेण्यासाठी पैसे नाहीत, याकडेही तालुका काँग्रेसचे सरचिटणीस नितीन गोहणे, दीपक जवादे, सुनील बोमनवार, अनिल म्हशाखेत्री, केशव भरडकर, हिवराज शेरकी, आशिष मनबतुलवार, सुनीता उरकुडे, दिवाकर भांडेकर, किशोर घोटेकर, परशुराम वाडगुरे, अनिल गुरुनुले, हरिभाऊ चिवंडे, प्रकाश घोटेकर, सुनील पाल, चक्रधर दुधे यांनी निवेदनातून लक्ष वेधले.