सुभाष धोटेंनाच काँंग्रेसची उमेदवारी द्या
By admin | Published: July 19, 2014 11:50 PM2014-07-19T23:50:26+5:302014-07-19T23:50:26+5:30
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पार पडलेल्या सभेत राजुरा विधानसभा क्षेत्रातील
कार्यकर्त्यांची सभा : निरीक्षकाकडे एकमुखी मागणी
चंद्रपूर : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पार पडलेल्या सभेत राजुरा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार सुभाष धोटे यांनाच तिकीट द्यावे, अशी मागणी निरीक्षकाकडे केली. कार्यकर्त्यांची सभा शनिवारी स्थानिक शुभमंगल कार्यालयात पार पडली.
यावेळी जिल्हा पर्यवेक्षक आमदार नदीम जावेद, जिल्हा समन्वयक संजय दुबे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, आमदार सुभाष धोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा महिला अध्यक्षा नंदाताई अल्लुरवार, राजुरा तालुका अध्यक्ष दादा पाटील लांडे, कोरपना स. आबीद अली, जिवती गोदरु पाटील जुमनाके, गोडपिंपरी राजीव सिंग चंदेल, युवक काँग्रेस लोकसभा अध्यक्ष शिवाराव पोलेशेट्टी, राजुरा नगर परिषद अध्यक्ष मंगला आत्राम, उपाध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्षा आरती चिल्लावार, नगर परिषद गटनेते स्वामी येरोलवार, सुनील देशपांडे, सय्यद सखावत अली, शाम बोलमवार, शारदा खंडाळे, दिपा करमानकर, प्रियदर्शनी उमरे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे, संचालक विजय बावणे, दिलीप नलगे, पांडुरंग जाधव, पंचायत समिती सभापती हिराताई रणदिवे, सभापती हर्षा चांदेकर, उपसभापती सुग्रीव गोतावळे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, उत्तम पेचे, नानाजी आदे, सरोज मुनोत, पंचायत समिती सदस्य हर्षाली गणेश गोडे, अब्दुल जमीर, निर्मला कुळमेथे, रामचंद्र कुरवटकर, राजीव पावडे, रत्नमाला तारे, वृंदावनी मून, भुमय्या अंगलवार, लोकसभा महासचिव मनोज तेलीवार, राजुरा विधानसभा उपाध्यक्ष राजू राऊत, महासचिव विक्रम येरणे, सचिन फुलझेले, चेतन जयपूरकर, अश्पाक शेख, गणेश गोडे, विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व बहुसंख्य कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिवती तालुक्यातील विठ्ठल पिल्लेवाड (टेकामांडवा), राहुल पांढरे (येरवा) या भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
संचालन डॉ. उमाकांत धोटे यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दादा पाटील लांडे यांनी तर आभार युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर यांनी मानले.
कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)