सफाई कामगारांना योजनेतून घर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:54 PM2018-08-29T22:54:02+5:302018-08-29T22:54:21+5:30

चंद्रपूर मनपा व जिल्ह्यातील नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या उपक्रमाची अंमलबजावणी सफाई कामगारांवर येते. त्यामुळे कामगारांच्या उत्तम आरोग्यासाठी विविध योजनांमधून घर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिले. समाज कल्याण कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात बुधवारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

Give cleanliness to the workers | सफाई कामगारांना योजनेतून घर द्या

सफाई कामगारांना योजनेतून घर द्या

Next
ठळक मुद्देदिलीप हाथीबेड : सामाजिक न्याय भवनात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर मनपा व जिल्ह्यातील नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या उपक्रमाची अंमलबजावणी सफाई कामगारांवर येते. त्यामुळे कामगारांच्या उत्तम आरोग्यासाठी विविध योजनांमधून घर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिले. समाज कल्याण कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात बुधवारी आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, चंद्रपूर मनपाचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी वनगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित समस्यांचा आयोगाचे हाथीबेड यांच्या उपस्थितीत निपटारा करण्यात आला. राज्यातील काही महानगरपालिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना अंतर्गत घरे उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली. चंद्रपूर महानगरपालिकेने या संदर्भात पाऊल उचलल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लाड समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकृतिबंधानुसार सफाई कर्मचाऱ्यांची भरती, महानगरपालिका सफाई कामगारांसाठी आवश्यकतेनुसार घरे, अनुकंपा भरती प्रक्रिया गतिशील करणे, सुट्टीच्या दिवशी कामाचा मोबदला निश्चि करणे, कालबद्ध पदोन्नतीमधील प्रकरणे निकाली काढणे, कंत्राटी पद्धतीच्या कामात सफाई कामगारांना प्राथमिकता देणे, किमान वेतनापेक्षा कमी वेतन दिल्यास कारवाई करणे, पोलिस ठाण्यांमध्ये नियुक्ती बाबतचा प्रस्ताव पाठवणे आदी मुद्यांवर चर्चा झाली. जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून यामध्ये प्रतिनिधींना सहभागी करण्यात येईल. दोन महिन्यातून एकदा समितीची बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी गौरीशंकर गावकर, पवन सातपूते, विजय हारकर, भालचंद्र राऊत आदीसह सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Give cleanliness to the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.